शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 4:16 AM

दोन दशकांहून अधिक काळ सेनेचा विरोध; विधानसभा निवडणुकीतही गाजला होता मुद्दा

- हितेन नाईक पालघर : अनेक वर्षे विरोध दर्शविणाऱ्या स्थानिकांच्या भावना पायदळी तुडवीत अखेर केंद्र सरकारने वाढवण बंदराच्या उभारणीला हिरवा कंदील दाखवल्याने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारपुढे पेच उभा राहणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी स्थानिक जनतेला दिलेला शब्द पाळायचा की केंद्र सरकारच्या बंदर विकासाच्या भूमिकेला समर्थन द्यायचे, अशा कात्रीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. येथील स्थानिक नेहमीच शिवसेनेसोबत राहिल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

१९९६-९७ मध्ये युती सरकारच्या काळात डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराच्या उभारणीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाकडून पुढे आला होता. मात्र स्थानिक मच्छीमार, शेतकरी, डायमेकर यांचा कडवा विरोध पाहता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना परिस्थिती समजून घेण्यासाठी वाढवण येथे पाठवले होते.

हे हरित क्षेत्र आहे. आठ ते १० हजार कुटुंबे डायमेकर व्यवसायावर अवलंबून आहेत. या भागात विविध मत्स्यसंपदेचे मोठे साठे अस्तित्वात आहेत. या व्यवसायात दोन ते तीन हजार बोटी असून लाखो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले. हा पर्यावरणपूरक भाग आणि त्याच्या जपणुकीसाठी स्थानिकांकडून एकजुटीने होणारा विरोध बाळासाहेबांपर्यंत पोहोचवण्यात आला. नंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हे बंदर रद्द करण्याचे आदेश दिले होते.

रद्द करण्यात आलेल्या या बंदराने पुन्हा डोके वर काढले आणि पर्यावरण प्राधिकरणाची परवानगी न घेता ५ जून २०१५ रोजी युतीच्या सरकारने केंद्र सरकारच्या ७४ तर राज्य सरकारच्या २६ टक्के गुंतवणुकीतून जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्यातून हे बंदर उभारणीचा घाट घातला होता. त्यामुळे पुन्हा स्थानिकांचा उद्रेक वाढला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या बंदराविरोधात मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उगारण्यात आले होते.

जिल्ह्यातील किनारपट्टीचा भाग हा कित्येक वर्षांपासून शिवसेना, युतीचा बालेकिल्ला आहे. २०१६ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी चिंचणी येथे झालेल्या सभेत या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल, तर शिवसेना स्थानिकांबरोबर असेल असे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. त्याचा पुनरूच्चार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मनोर येथील प्रचारसभेत केला होता आणि वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने मला मुंबईत भेटावे असे निमंत्रणही दिले होते.

सर्वाेच्च न्यायालयात जाणार

डहाणू पर्यावरण प्राधिकरणाने १९९८ मध्ये सीआरझेड १, ग्रीन झोन आदी पाच मुद्दे गृहीत धरल्याने हे बंदर होऊ शकले नव्हते. वाढवणविरोधी संघर्ष समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असताना बंदराला मिळालेली मंजुरी चुकीची आहे. आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत.- वैभव वझे, सहसचिव, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVasai Virarवसई विरार