सीसीटीव्हीचे घोंगडे दुकानदारांच्या गळ्यात?
By Admin | Updated: March 3, 2016 02:09 IST2016-03-03T02:09:16+5:302016-03-03T02:09:16+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका शहरातील महत्वाच्या २१७ ठिकाणी ६८१ सीसीटिव्ही कॅमेरे बसवणार असली तरी पालिका हद्दीतील दुकानदारांनी त्यांच्या दुकानात व दुकानाच्या

सीसीटीव्हीचे घोंगडे दुकानदारांच्या गळ्यात?
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका शहरातील महत्वाच्या २१७ ठिकाणी ६८१ सीसीटिव्ही कॅमेरे बसवणार असली तरी पालिका हद्दीतील दुकानदारांनी त्यांच्या दुकानात व दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी
केल्याने सुरक्षेच्या नावाखाली हा विषय दुकानदारांच्या गळ््यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकांकडून बसवल्या जाणाऱ्या सीटीटिव्हींची दुरूस्ती-देखभाल न झाल्यास काही काळातच ते बंद पडतात, त्यामुळे दुकानदारांनी कॅमेरे लावल्यास ते सुरूही राहतील व त्यातून गुन्हेगारीला आळा घालता येईल, असा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात पालिका आयुक्त रवींद्रन यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा सर्व तपशील मांडण्यात आला. या बैठकीला वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त संजय जाधव, पालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, कार्यकारी अभियंता यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते. सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणी समिती आयुक्तांनी स्थापन केली आहे. असे कॅमेरे बसविण्यासाठी पीडब्लूसी या संस्थेला सविस्तर अहवाल द्यायला सांगितला होता.
या ६८१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमांड रुम पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात असेल, तर सीसीटीव्ही रेकॉर्डिंंग पाहण्याची सुविधा व त्याचे डाटा सेंटर पालिका मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. या यंत्रणेत चित्रीकरणाचा साठा करून ठेवण्याचीही व्यवस्था आहे. पोलिस व इतर यंत्रणांना अलर्ट पाठविण्यासाठी व्हीडिओ अॅनालिटिक्स सॉफ्टवेअर आहे. इतर आवश्यक ठिकाणीही चित्रीकरण पाहता येईल. फुटेज पाहून तातडीने निर्णय घेण्यासाठी एसओपी, उपकरणाची देखभाल-दुरुस्तीचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात यईल.