जव्हारमध्ये कारला अपघात दोघांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 19:30 IST2020-08-17T19:28:27+5:302020-08-17T19:30:03+5:30
जव्हार येथील तीन तरुण स्विफ्ट डिझायर कार घेऊन जव्हार कडे येत असताना कासाटवाडी येथील एका वळणावर चालकाचा ताबा सुटून वाहन झाडावर जाऊन आदळले, अपघात इतका भयानक होता की वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

जव्हारमध्ये कारला अपघात दोघांची प्रकृती चिंताजनक
जव्हार - जव्हारहुन अवघ्या सात किमी अंतरावर असलेल्या कासाटवाडी येथे वळणावर कारचा अपघात होऊन दोन गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाले असून, वाहनाचे चक्काचूर झाले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली असून गंभीर रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
जव्हार येथील तीन तरुण स्विफ्ट डिझायर कार घेऊन जव्हार कडे येत असताना कासाटवाडी येथील एका वळणावर चालकाचा ताबा सुटून वाहन झाडावर जाऊन आदळले, अपघात इतका भयानक होता की वाहनाचा चक्काचूर झाला आहे. वाहनातिल तुषार महादेव गावित वय 21 व मयुरेश सुरेश म्हसे वय 18 हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्रथम कुटीर रुग्णालय जव्हार येथे प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती अति गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे, तर तिसरा कुणाल बाळू सापटा वय 18 याची प्रकृती स्थिर असून त्याला कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.