शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉप अचानक गायब?; स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 2:02 AM

महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती.

नालासोपारा : महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती. परंतु आता बिल्डरांच्या भल्यासाठी प्रशासनाकडून प्रवाशांवर कसा अन्याय केला जातो याचे जिवंत उदाहरण नालासोपारातील आचोळे चौकात बघायला मिळत आहे. बिल्डरच्या भल्यासाठी महापालिकेने चक्क आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉपच गायब केले आहेत. महानगरपालिकेचे हे कृत्य अत्यंत संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटत आहे. तर बसस्टॉपअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

३ आॅक्टोबर २०१२ रोजी वसई-विरार महानगरपालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरु केली होती. या वेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व मार्गिकांवर बसस्टॉप उभारण्यात आले होते. त्याच वेळी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील मुख्य चौकाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी बसस्टॉपची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून आचोळे चौकातील या बसस्टॉपचा प्रवाशांकडून वापर केला जात होता. परंतु काही महिन्यांपासून नियोजित जागेत असलेला हा बसस्टॉप अचानक गायब झाला आहे. बसस्टॉप नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी उन्हातान्हात उभे राहावे लागते. विशेष म्हणजे वसई-विरार परिवहन सेवेसह ठाणे मनपाची परिवहन सेवाही याच बस थांब्यावर थांबते. हा बसस्टॉप हटविण्यामागचे कारण शोधण्यासाठी अधिक खोलात गेले असता एक धक्कादायक माहिती पुढे आली की, आचोळ्यात ज्या ठिकाणी जुना बसस्टॉप होता. त्याच्या मागच्या बाजूस एक इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत आता मोठे शोरुम उघडण्यात आले आहे.

तसेच या जुन्या बस स्टॉपमुळे इमारतीची पुढची बाजु पूर्णपणे झाकली जात असल्याने या इमारतीचे मूल्य देखील शून्य होत आहे. म्हणून बिल्डरच्या भल्यासाठी महानगरपालिकेने हा बसस्टॉप हटविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका प्रशासनाकडून आता आचोळे चौकात नवीन बसस्टॉप बांधण्यासाठी जागेची चाचपणी सुरू आहे. या प्रकाराविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

त्या बसस्टॉपमुळे मोठ्या गाड्या वळवताना त्रास व्हायचा तसेच अपघात होऊ नये म्हणून तो हटवला असला तरी त्याच ठिकाणी नवीन बस स्टॉप बनणार आहे. त्या ठिकाणी साचा बनवून आरसीसी बांधकाम केलेले आहे. ४ ते ५ दिवसांमध्ये साचा आल्यावर लगेच तिथे लावणार आहे.- भुपेन पाटील, स्थानिक नगरसेवक.सदर ठिकाणी बस स्टॉप बनवला जात होता, पण मोठ्या वाहनांना वळवताना त्रास होईल अशा तक्रारी आल्यामुळे बस स्टॉप आजूबाजूला बनवला जाणार आहे. - प्रितेश पाटील, सभापती,परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार