शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

budget 2021 : यंदाच्या बजेटने काय दिले रे भाऊ ? शेती, उद्योगांसह अनेक क्षेत्रांसाठी चांगल्या तरतुदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:57 IST

budget 2021: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सादर केलेल्या  अर्थसंकल्पातून विविध क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी जाहीर केल्या आहेत.

पालघर - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सादर केलेल्या  अर्थसंकल्पातून विविध क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी जाहीर केल्या आहेत. पालघर जिल्हा हा शेतीप्रधान आणि मच्छीमारीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जिल्ह्यात उद्योगांची संख्याही मोठी आहे. या सर्वच क्षेत्रांसाठी काही ना काही तरतूद झालेली असल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाचे नागरिकांमधून स्वागत होताना दिसत आहे.कोरोनाकाळाने सर्वच क्षेत्रांना कमी-अधिक प्रमाणात फटका बसलेला असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील लोकांच्या यंदाच्या अर्थसंकल्पाकडून खूपच अपेक्षा होत्या. या अपेक्षा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून व्यक्तही केल्या होत्या. त्या अपेक्षा खरेच पूर्ण झाल्या आहेत असे म्हणता येत नाही, असे म्हणतानाच मरणासन्न उद्योगांना उभारी मिळेल, आरोग्य सुविधेसाठी २.२३ लाख कोटींची तरतूद दूरगामी परिणामकारक ठरेल. याबरोबरच आयकर पुनरावलोकन कालावधी सहा वर्षांवरून तीन वर्षांवर आणून फेसलेस ऑडिटच्या अंमलबजावणीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे वाटते. कोविडमुळे जर्जर अवस्थेत असलेल्या आर्थिक स्थितीला उभारी मिळण्यासाठी केलेल्या उपाययोजना उपयोगी पडतील, तरीही आर्थिक बळकटी येण्यासाठी अजून पुरेशा योजनांची गरज होती. अपेक्षित करवसुलीत खूप तफावत असूनही घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत. तसेच शेती क्षेत्रासाठी लाभदायी अर्थसंकल्प असल्याचे मान्यवरांना वाटत आहे.लघुउद्योगांकरिता केलेल्या पतपुरवठा योजनांमुळे मरणासन्न उद्योगांना पुन्हा उभारी घेण्यास निश्चितच मदत होईल, तर निर्यात करणाऱ्या उद्योगांना आयकर सवलत दिलेली नसून, निर्यात वृद्धीत थेट नफ्याची तरतूद केलेली नाही. यामुळे निर्यातवृद्धी करण्यास भरपूर वाव असूनही त्यामध्ये प्रगती होईल की नाही, हे भविष्यात समजेलच. पर्यावरण संरक्षणाकरिता केलेली तरतूद, रासायनिक उद्योगाकरिता कशी राबवली जाते, त्यावर बरेच काही अवलंबून असेल. - डी. के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टिमा) स्वस्त, परवडणाऱ्या घरांसाठी कर्ज घेणाऱ्यांना व्याजात रु. १.५ लाख आयकरात सूट या वर्षीही मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत सरकारी बँकांना रु. २० हजार कोटींच्या भांडवली मदतीची तरतूद करण्यात आली आहे. कोविडदरम्यान जीवाची पर्वा न करता ग्राहकांना सेवा देणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख अर्थमंत्र्यांनी केल्याने समाधान वाटले. मात्र, सहकारी बँकांना अशी मदत व सुविधा देणे गरजेचे होते. सहकारी बँका मात्र उपेक्षितच राहणार आहेत.- संदेश लखुजी जाधव, संचालक व माजी चेअरमन, वसई जनता सहकारी बँक लि.गेल्या वर्षात कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला होता, ती बिकट परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतो. कोरोनाकाळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामविकास, रस्ते विकास, शिक्षण आदी क्षेत्रांसाठी देखील अर्थमंत्र्यांनी यंदा चांगली तरतूद केलेली आहे. वाडा तालुक्यात स्टिल रोलिंग मिल्स जास्त  प्रमाणात असून त्यांना अवकळा आलेली होती, या अर्थसंकल्पाने त्यांना दिलासा मिळाला आहे. उद्योगधंद्यांना सवलती दिल्याने रोजगार निर्मिती वाढणार आहे. एकूणच अर्थसंकल्प दिलासादायक असला तरी अंमलबजावणी किती वेगाने व कशी होते, यावर अर्थसंकल्पाची फलश्रुती अवलंबून आहे.- श्रीकांत भोईर, संचालक, कुडूस विभाग शिक्षण संघ, वाडा शेतकऱ्यांसाठी केलेली तरतूद ही नियोजनाचा अभाव असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. या अर्थसंकल्पात सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. पण या बँकांवर ग्रामीण भागाचे वा शेतकरी वर्गाचे अर्थकारण चालते अशा सहकारी क्षेत्रातील बँकांसाठी या अर्थसंकल्पात काहीही हाती न लागल्याने ग्रामीण भागाला चालना कशी मिळेल हा प्रश्न आहे.- राजेंद्र गोपाळ पाटील, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकरदात्यांना अर्थसंकल्पाकडून थोड्याफार अपेक्षा होत्या, मात्र राजकीय अजेंडासमोर ठेवून काही योजनांच्या घोषणा करण्यापलीकडे अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्ये त्यांना काहीही समाधान मिळालेले नाही. परवडणारी घरे यावरील सवलती अजून एक वर्षांनी वाढवून देऊन व ऑडिट करण्याची मर्यादा फक्त डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना देऊन सर्वसामान्य करदात्याच्या तोंडाला मात्र पाने पुसली गेली आहेत.- भरत धोंडे, सीए, सनदी लेखापाल,पालघर शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा, रेल्वेसाठी १.१० हजार कोटींची विक्रमी तरतूद, आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आरबीआयचे २७,००,००० कोटींचे पॅकेज, कोविड लसीकरणासाठी ३५,००० कोटींची तरतूद, आत्मनिर्भर भारतासाठी जीडीपीच्या १३ टक्के तरतूद, जलजीवन मिशनसाठी २,००,००० कोटींची तरतूद आदींमुळे यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरला आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच जनसामान्यांसाठी अतिशय उत्तम असा अर्थसंकल्प आहे.- प्रशांत प्रभाकर पाटील, भाजप उपाध्यक्ष, पालघर बजेटवर कुठे काय चर्चा बसस्थानकयंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, उद्योगांना, शेतीला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. अशी कुजबूज जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर होताना दिसत होती. सत्ताधारी पक्षाच्या समर्थक मतदारांना हा अर्थसंकल्प चांगला असल्याचे वाटत होते. त्यामुळे ते आपल्या मित्र-मंडळींशी तशा प्रकारची चर्चा करीत होते. रेल्वेस्थानकसर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान असतानाच अर्थसंकल्पाबाबतही चर्चा होताना दिसत होती. चाकरमानी कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद झाली आहे, याविषयी गटागटाने चर्चा करीत होते. जे सत्ताधारी पक्षाचे समर्थक नाहीत, ते मात्र टीकेचा सूर लावताना दिसत होते.

टॅग्स :budget 2021बजेट 2021palgharपालघर