ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भाऊ-बहिणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:00 IST2025-05-14T19:00:22+5:302025-05-14T19:00:33+5:30

Palghar Accident News: जेवण झाल्यानंतर पालघर येथे आइस्क्रीम खाऊन आपल्या मोटरसायकल वरून घराकडे परत जाणाऱ्या दोन सख्या बहिण भावाच्या मोटरसायकल ला एका ट्रेलर ने  दिलेल्या जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Brother and sister die after being hit by a trailer and a bike | ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भाऊ-बहिणीचा मृत्यू

ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत भाऊ-बहिणीचा मृत्यू

- हितेन नाईक 
पालघर:- जेवण झाल्यानंतर पालघर येथे आइस्क्रीम खाऊन आपल्या मोटरसायकल वरून घराकडे परत जाणाऱ्या दोन सख्या बहिण भावाच्या मोटरसायकल ला एका ट्रेलर ने  दिलेल्या जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाला आहे. पालघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ   उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले मंगेश विश्वकर्मा (वय 22 वर्ष )आणि पूजा विश्वकर्मा (वय 25 वर्ष) हे दुखी सखी भावंड आपल्या कुटुंबासह पालघर माहीम रस्त्यावरील हरणवाडी येथील एका रहिवासी संकुलात राहत होते. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घरून जेवण करून ते आइस्क्रीम खाण्यासाठी पालघर शहरात गेले होते.आइस्क्रीम खाऊन ते  आपल्या मोटरसायकल वरून आपल्या घराकडे परत येत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रेलर ने त्यांच्या मोटरसायकल ला हॉटेल तशीश समोर जोरदार धडक दिली.ह्या घटनेत त्या दोन्ही भावंडांचा जागीच मृत्यू झाला.ही धडक इतकी भयानक होती की त्या दोन्ही भावंडाच्या शरीराचे तुकडे रस्त्यालगत इतरत्र पसरले होते. या अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्यांचा शोधासाठी पालघर पोलिसांनी एक टीम पाचरण केली असल्याचे ह्या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात यांनी लोकमतला सांगितले. सदर प्रकरणी ट्रेलर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Brother and sister die after being hit by a trailer and a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात