दोन्ही दरोडेखोरांना मंगळवारपर्यंत कोठडी; मुथ्थुट फायनान्स दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:42 IST2020-02-08T00:41:44+5:302020-02-08T00:42:05+5:30
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दरोडा पडण्यापासून वाचला होता. मात्र दगडफेकीमुळे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

दोन्ही दरोडेखोरांना मंगळवारपर्यंत कोठडी; मुथ्थुट फायनान्स दरोडा
नालासोपारा : नायगाव पूर्वेकडील जूचंद्र गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुथ्थुट फायनान्स कंपनीच्या गाळ्याच्या भिंतीला होल करून अंदाजे ३ कोटीचे सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दरोडेखोरांना वालीव पोलिसांनी पकडले असून एक दरोडेखोर अद्याप फरार आहे. पकडलेले दोन्ही आरोपी मुंबईच्या माहीम येथील बांद्रा हाजीअली उड्डाण पुलासमोरील चाळीत राहणारे असून बाबर मुन्ना शहा (३२) आणि मुकशेद चानू शेख (२४) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना वसई न्यायालयात हजर केले असता ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दरोडा पडण्यापासून वाचला होता. मात्र दगडफेकीमुळे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये भरती केले असून शुक्र वारी त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरच मुथ्थुट फायनान्स कंपनीकडून १०-१० हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचेही कळते.