'बोईसर चिल्लार फाटा रस्त्याचे काम निकृष्ट, तत्काळ बंद करा!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:35 AM2019-01-28T00:35:21+5:302019-01-28T00:35:35+5:30

खासदार गावित यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना; आता लक्ष लागले अंमलबजावणीकडे

'Boisar Chillar Phata road work is inconsequential, stop immediately!' | 'बोईसर चिल्लार फाटा रस्त्याचे काम निकृष्ट, तत्काळ बंद करा!'

'बोईसर चिल्लार फाटा रस्त्याचे काम निकृष्ट, तत्काळ बंद करा!'

googlenewsNext

बोईसर : ८४ कोटी रु पये खर्च करून मुम्बई -अमदाबाद महामार्गाला जोडणार्या बोईसर - चिल्लार फाटा या साडे सोळा कि.मी.रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याने ते बंद करण्यात यावे अशा सूचना पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर एमआयडीसीच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. खासदार गावित यांनी नुकतीच एमआयडीसीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एस. आर .पाटील , तारापूर विभागाचे उपअभियंता चंद्रकांत भगत यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या दर्जाविषयी स्वत: पाहणी केली. यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे पंचायत समिती सदस्य जितेंद्र (पप्पू) संखे होते.

खा. गावितांनी या रस्त्यावरील मान गावातील शाळे समोरील डांबरीकरण केलेला रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदून पाहणी केली असता त्यांना त्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट झाले असल्याचे जाणवल्याने हे बांधकाम थांबवण्याची सूचना दिली मात्र डिव्हायडरचे जे काम सुरू ठेवण्यास सांगून काही जमिनीच्या संदर्भात ग्रामस्थांची जिल्हाधिकºयांकडे बैठक बोलावू असे सांगितले. या संदर्भात उपस्थित अधिकाºयांना विचारले असता ज्या ठिकाणी खा. गावितांनी रस्ता खोदण्यास सांगितला त्या ठिकाणचे अजून काम पूर्ण झाले नाही तर त्या ठिकाणी विजेचे खांबही असल्याने अडचणी आहेत त्याचप्रमाणे टेंडर नुसार सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पाच वर्षे रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. तर सुरु असलेल्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी मुंबई यांना एमआयडीसीच्या वतीने विनंती केल्या नुसार आयआयटीची टीम सदर झालेल्या कामाची व सुरू असलेल्या कामाची तपासणी करून गेले असून अहवाल अप्राप्त आहे आयआयटी मुंबई यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

Web Title: 'Boisar Chillar Phata road work is inconsequential, stop immediately!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.