BJP complains to BJP corporators for harassing and harassing Congress corporators | काँग्रेस नगरसेवकांना फोडण्यासाठी आमिष व त्रास देणाराया भाजपा नगरसेवका विरोधात पोलीसात तक्रार

काँग्रेस नगरसेवकांना फोडण्यासाठी आमिष व त्रास देणाराया भाजपा नगरसेवका विरोधात पोलीसात तक्रार

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारीला होणाराया निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवक फुटण्याची धास्ती असल्याने भाजपा नगरसेवकांना गोव्याला हलवले असतानाच काँग्रेस नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करणाराया भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महापालिकेत भाजपाचे ६१, शिवसेना २२ व काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपातील असंतोषा मुळे नगरसेवक फुटण्याच्या धास्तीने भाजपा नगरसेवकांना गोव्याच्या द ललित या पंचतारांकीत हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीचे ३४ नगरसेवक असुन भाजपा कडे स्पष्ट बहुमत असुनही त्यांना नगरसेवक फुटण्याची धास्ती आहे. त्यातच आमदार गीता जैन व समर्थक नगरसेवकांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात आघाडी उघडल्यास भाजपाला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

धास्तावलेल्या भाजपा नेतृत्वाने आता काँग्रेस आघाडीचे नगरसेवक फोडण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातुनच काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उमा सपार यांना फोडण्यासाठी भाजपाचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी सतत फोन करुन आमिष दाखवण्यासह मानसिक त्रास दिल्याची तक्रार काँग्रेसने नया नगर पोलीस ठाण्यात केली आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, कार्याध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत, राजीव मेहरा, माजी नगरसेवक शफिक खान, पदाधिकारी दिप काकडे आदींनी नया नगर पोलीस ठाण्यात ध्रुवकिशोर विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

उमा सपार ह्या ज्येष्ठ नगरसेविका असुन त्या आजारी आहेत. त्यांना नुकतेच घरी आणले आहे. तसे असताना ध्रुवकिशोर हे सपार व त्यांच्या मुलास सतत फोन करुन भाजपाला साथ देण्यासाठी आमिष दाखवत आहेत. मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे ध्रुवकिशोर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. नया नगर पोलीस ठाण्यातुन ध्रुवकिशोर ना फ ोन करुन पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगीतले असता आपण २६ फेब्रुवारी रोजी शहरात येणार असल्याचे सांगीतल्याचे सुत्रांनी सांगीतले.

ध्रुवकिशोर यांना लाज वाटली पाहिजे की आजारी वृध्द नगरसेविका व कुटुंबाचा असा छळ करायला. भाजपा कडे स्पष्ट बहुमत असताना त्यांना त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते. . सत्ता आणि संपत्तीसाठी लाचार असणाराया भाजपाच्या अशा नगरसेवकां बद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करुन मीरा भार्इंदरच्या जनतेची माफी मागावी असे आवाहन मालुसरे यांनी केले आहे.
 

Web Title: BJP complains to BJP corporators for harassing and harassing Congress corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.