पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कंपनीत वाय गळतीमुळे चार कामारांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मेलोडी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड ह्या तारापूर एमआयडीसी मधील फार्मासिटिकल कंपनीमध्ये वायू गळती झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
अन्य काही कामगारांना बोईसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तारापूर एमआयडीसी मधील फार्मासिटिकल कंपनीमध्ये अचानक वायू गळती झाल्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला. आधी कर्मचाऱ्यांना काही कळेना तेवढ्यात काही कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली. कर्मचाऱ्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत आतार्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
वायू गळती होण्यामागील कारण अजूनही समोर आलेले नाही.