शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील सेंट एन्स शाळेला भीषण आग; अडकलेल्या 2 शिक्षकांची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:31 IST

Big Fire to School : सुदैवाने जीवितहानी नाही

ठळक मुद्देविशेष म्हणजे शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी या आगीच्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित अथवा यामध्ये कोणी जखमी झालेल नाही.

आशिष राणे

वसई पश्चिमेतील विद्यामंदिर मार्ग परिसरातील एका इंग्लिश कॉन्व्हेंट स्कुलला बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेवेळी शाळेत तिसऱ्या मजल्यावर आगी प्रसंगी अडकून बसलेल्या  2 शिक्षकांची वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभागात विद्यामंदिर मार्ग शेजारी सेंट एन्स कॉन्व्हेंट स्कुलची मोठी इमारत आहे.

शाळा बंद असलेल्या या इमारतीत त्यावेळी शालेय कामकाजासाठी दोन शिक्षिका तेथील तिसरा मजल्यावर काम करीत होत्या.दरम्यान अचानकपणे या इमारतीत सकाळी 11 वाजता स्कुलच्या तळमजल्यावरील स्टोर रूम मध्ये आगीने पेट घेतला असल्याचे बाजुला असलेल्या काही रहिवासी संकुलातील नागरिकांनीं पाहताच त्यांनी तात्काळ वसईच्या सनसिटी दिवाणमान अग्निशमन दलाला कळविले. तात्काळ त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शर्तीचे प्रयन्त करत ही आग आटोक्यात आणली. मात्र, त्याचवेळी येथील तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन शिक्षिकाना देखील सुखरूप खाली आणण्यात यशस्वी ही झाले. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्यप कळु शकलं नाही.

विशेष म्हणजे शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी या आगीच्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित अथवा यामध्ये कोणी जखमी झालेल नाही. मात्र, स्कुलची बऱ्यापैकी मालमत्ता व कागदपत्रे यांचे मोठं नुकसान झाले आहे.या संदर्भात स्कुल च्या व्यवस्थापन कमिटी शी संपर्क साधला मात्र तो झाला नाही.

टॅग्स :fireआगSchoolशाळाFire Brigadeअग्निशमन दलVasai Virarवसई विरारTeacherशिक्षक