भाईंदर-गायमुखसाठी आली १५ हजार कोटींची बोली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:57 IST2025-05-21T14:56:51+5:302025-05-21T14:57:13+5:30
मीरा भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काढलेल्या दोन्ही निविदांमध्ये कंपनीने सर्वांत कमी बोली लावली आहे.

भाईंदर-गायमुखसाठी आली १५ हजार कोटींची बोली
मुंबई : निवडणूक रोख्यांमुळे चर्चेत आलेल्या मेघा इंजिनीअरिंग कंपनीला मुंबईतील आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे तब्बल १५ हजार कोटी रुपयांचे काम मिळणार आहे. मीरा भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काढलेल्या दोन्ही निविदांमध्ये कंपनीने सर्वांत कमी बोली लावली आहे. मात्र, एमएमआरडीएच्या निविदा रकमेपेक्षा ही बोली साडेनऊ टक्क्यांहून अधिक रकमेची आहे.
किती रुपयांच्या निविदा?
भाईंदर ते फाउंटन हॉटेल - ६,१६३ कोटी निविदा ९.५९ टक्के अधिक दराने दाखल
फाउंटन हॉटेल ते गायमुख - ९,०१९ कोटी - निविदा ९.९ टक्के अधिक दराने
आणखी एक काम
एमएमआरडीएच्या १२ हजार कोटींच्या ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामानंतर आता आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे काम मेघा इंजिनीअरिंगला मिळणार आहे. त्यातच मेघा इंजिनीअरिंगकडून राज्यभरात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची कामे सुरू आहेत.