पाकच्या सामन्यावर सट्टा; भाजपा नेत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 05:50 IST2018-12-21T05:49:36+5:302018-12-21T05:50:35+5:30

२६ सप्टेंबर ला वसईच्या वालीव पोलिसांनी त्याच्यावर जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Betting on Pak match; BJP leader arrested | पाकच्या सामन्यावर सट्टा; भाजपा नेत्याला अटक

पाकच्या सामन्यावर सट्टा; भाजपा नेत्याला अटक

वसई : पाकिस्तान सोबतच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी ठाणे भाजपचे पदाधिकारी विकास दाभाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तो ठाण्याच्या प्रभाग क्र मांक २२ (ड) चा भाजपा पदाधिकारी आहे, तसेच तो ठाणे महापालिकेतील एक मोठा ठेकेदारही आहे. त्याने भाजपाच्या तिकिटावर ठाणे महापालिका निवडणूक लढविली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

२६ सप्टेंबर ला वसईच्या वालीव पोलिसांनी त्याच्यावर जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आशिया कप ट्रॉफीतील बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तानच्या वन डे सामन्यावर तोे काही लोकांसोबत सट्टा लावत होता. पालघर गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी सट्टा सुरु असलेल्या ठिकाणी धाड टाकली, मात्र त्याने तेथून पळ काढला होता. त्याठिकाणाहून पालघर गुन्हे शाखेने १० जणांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान त्याचे नाव समोर आले होते. अखेर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी त्याला ठाण्यातून अटक केली. वसई न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Betting on Pak match; BJP leader arrested