शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

तारापूरच्या दाेन कंपन्यांच्या उत्पादनावर घातली बंदी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:37 IST

Tarapur News : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुगम केमिकल्स आणि डेल्टामाइक स्पेशालिटी या दाेन कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

बोईसर : प्रदूषणासंबंधीची नियमावली काटेकाेरपणे न पाळणाऱ्या तारापूर एमआयडीसीतील दाेन कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदीची कारवाई केली आहे. अशाच प्रकारे आणखी काही उद्योगांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुगम केमिकल्स आणि डेल्टामाइक स्पेशालिटी या दाेन कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व सर्वेक्षण करणाऱ्या टीमने या कंपन्यांना दिलेल्या भेटीवेळी उत्पादन प्रक्रियेदरम्यान मंडळाने दिलेल्या माहितीप्रमाणे, तसेच पर्यावरणसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी काटेकोर होत नसल्याचे आणि काही त्रुटी निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली. तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांतून व सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) प्रक्रिया न करताच, मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूर समुद्रात आणि परिसरातील नाल्यांमध्ये सोडले जाते. त्याचा दुष्परिणाम नवापूर किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीन, पर्यावरण आणि आरोग्यावर होत असल्याची याचिका अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केली हाेती. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर, २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद व उत्पादन का बंद करण्यात येऊ नये, अशा नाेटिसा बजावण्यात आल्या हाेत्या, तर काहींचे उत्पादन तात्पुरते स्थगित केले हाेते. मात्र, यानंतरही काहीच सुधारणा नसून या कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी करण्याची स्थानिकांकडून हाेत आहे. दरम्यान, प्रदूषण मंडळाच्या कारवाईने इतर प्रदूषणकारी कंपन्यांचेही धाबे दणाणले आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार