जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:12 IST2021-09-06T12:11:51+5:302021-09-06T12:12:03+5:30

शिक्षकदिनी हा सन्मान माझ्या या अवस्थेत असताना मला संस्थेच्या वतीने प्राप्त होतो या पेक्षा पोचपावती काय असू शकेल असे म्हणत संस्थेचे आभार मानले आहेत.

Awarded Padma Shri Vikhepatil to Senior Literary Father Francis Dibrito | जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान 

जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान 

- आशिष राणे

वसई- जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना शिक्षकदिनाचे औचित्य साधून  रविवार दि 5 सप्टेंबर 2021 रोजी पद्मश्री विखेपाटील हा मानाचा पुरस्कार त्यांच्या वसईतील राहत्याच घरी प्रदान करण्यात आल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय फादर रेमंड यांनी लोकमतशी बोलताना दिली.

फादर दिब्रिटो हे प्रकृती अस्वस्थामुळे हालचाल करु शकत नाही त्यामुळे आमंदार राधाकृष्ण विखेपाटील यांच्यावतीने, त्यांच्या संस्थेचे चेअरमन  नंदकिशोर राठी, प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देविचंद भारत तांबेपाटील तसेच अमोल पाटील आदि मंडळी यावेळी फादर दिब्रिटो यांच्या राहत्या घरी उपस्थित राहून  संस्थेच्या पदाधिकऱ्यांनी हा मानाचा पुरस्कार त्यांना बहाल केल्यानं सर्वत्र पंचकोशी त आनंदाचे वातावरण आहे तसेच हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर फादर दिब्रिटो यांनी  शिक्षकदिनी हा सन्मान माझ्या या अवस्थेत असताना मला संस्थेच्या वतीने प्राप्त होतो या पेक्षा पोचपावती काय असू शकेल असे म्हणत संस्थेचे आभार मानले आहेत

Web Title: Awarded Padma Shri Vikhepatil to Senior Literary Father Francis Dibrito