लग्न मोडल्याने आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:57 IST2022-04-23T12:55:43+5:302022-04-23T12:57:40+5:30

पालघर पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळल्यावर, आरोपी डॉक्टर पती आणि त्याचे कुटुंबीय पळून गेले आहेत.

Attempted suicide due to marriage break up | लग्न मोडल्याने आत्महत्येचा प्रयत्न

लग्न मोडल्याने आत्महत्येचा प्रयत्न

पालघर: लग्नाची तारीख ठरली, पत्रिका वाटल्या आणि आपल्या सुखद स्वप्नांमध्ये रंगलेल्या धनश्री धोटे या बीई इंजिनीअर झालेल्या मुलीच्या भावी डॉक्टर पती जिनीत कुमार बबन गावड (रा.क्रिस्टल पार्क, पालघर) याने लग्नाला नकार दिला. या मोठ्या आघाताने कोलमडलेल्या वधूने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

येत्या सोमवारी लग्न होणार होते. पालघर पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळल्यावर, आरोपी डॉक्टर पती आणि त्याचे कुटुंबीय पळून गेले आहेत. पाेलीस या सगळ्यांचा शाेध घेत असून लवकरच त्यांना अटक करू, असे सांगितले.
 

 

Web Title: Attempted suicide due to marriage break up