शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:38 PM

पैशांसाठी निवडला मार्ग; पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाºया एका तरुणीचे सोशल मीडियावर असलेले फोटो एडिट करून तो ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पीडित तरुणीने गुरुवारी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा दाखल करून त्याला अटक करत वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.नालासोपारा पूर्वेकडील परिसरातील २५ वर्षीय तरु णीच्या मोबाइलवर ११ आणि १२ नोव्हेंबरला आरोपी अनिकेत शेलार (२०) याने एक अश्लील फोटो एडिट करून तेथे पीडित तरुणीचा चेहरा लावला आणि तो फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. त्यानंतर १० हजार रु पयांची मागणी करून तिला ब्लॅकमेल करू लागला. तसेच पैसे दिले नाही तर दाभाड, नालासोपारा, कल्याण परिसरात व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. पीडितेने सर्व हकीकत घरच्यांना सांगून गुरुवारी तुळींज पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगत तक्र ार देऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोबाइल नंबरद्वारे आरोपी तरु णाचा शोध घेऊन त्याला शुक्रवारी अटक केली.नोकरीसाठी पैसे द्यावे लागतील, त्यामुळे अगोदरच तजवीज करून ठेवण्यासाठी लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा मार्ग आरोपी अनिकेत शेलार (२०) याने निवडला होता. त्यासाठी त्याने व्हॉट्सअ‍ॅपवरील सुंदर मुलींचे फोटो स्क्रीनशॉट घेत मोबाइलमध्ये सेव्ह केले होते. त्यानंतर त्याने त्या फोटोचे अश्लील फोटोत एडीटिंग केले आणि त्या मुलींना त्यांचे असे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करु न बदनामीची धमकी देत होता. फोटो व्हायरल न करण्याच्या बदल्यात तो त्यांच्याकडून दहा ते वीस हजार रु पये रक्कमेची मागणी करत होता. पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुलींना अशाप्रकारे तो ब्लॅकमेल करत होता. त्या मुलींनी पडघा पोलीस ठाण्यात याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. तर तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका मुलीला अशाप्रकारे तो ब्लॅकमेल करत असताना, पालघर पोलिसांच्या सायबर सेलच्या मदतीने आरोपी अनिकेतच्या मुसक्या आवळल्या आहे.आरोपी अनिकेत शेलार हा मुंबईच्या कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत दुसºया वर्षात शिकत असून त्यांने एअर इंडिआमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. एअर इंडिआमध्ये नोकरीसाठी पैसे मोजावे लागतील असा त्याचा समज झाला होती. त्यासाठीच पैसे जमा करण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबला होता.- डी एस पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे