अर्नाळा ग्रामपंचायती विरोधात अपंगांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:29 IST2018-03-31T02:29:32+5:302018-03-31T02:29:32+5:30

ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधी खर्च न केल्याने परत गेला आहे. त्यामुळे दिव्यांग सुविधांपासून वंचित

Arnala's fast against the Arnala Gram Panchayat | अर्नाळा ग्रामपंचायती विरोधात अपंगांचे उपोषण

अर्नाळा ग्रामपंचायती विरोधात अपंगांचे उपोषण

वसई : ग्रामपंचायतीच्या उदासिनतेमुळे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधी खर्च न केल्याने परत गेला आहे. त्यामुळे दिव्यांग सुविधांपासून वंचित राहिल्याचा आरोप करीत अपंग कल्याणकारी संस्थेने शनिवारी अ़र्नाळा ग्रामपंचायतीच्या आवारात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी दरवर्षी तीन टक्के निधी अपंग कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, अर्नाळा ग्रामपंचायतीने याची अंमलबजावणी न केल्याने हा निधी जिल्हा कोषागारात जमा करावा लागला आहे. त्यामुळे दिव्यांग लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष शमीम खान यांनी केला आहे.
गावात दिडशे दिव्यांग व्यक्ती आहेत. संस्थेने त्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावाही केला होता. पण, आर्थिक वर्षातील निधी खर्च करण्यात न आल्याने परत गेला असल्याने दिव्यांग लाभापासून वंचित राहिले आहेत.

Web Title: Arnala's fast against the Arnala Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.