शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

शेतकरीविरोधी कायद्याचा पालघरमध्ये सर्वत्र निषेध; वाड्यात भाजपाविरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:19 AM

शेतकऱ्यांविरोधात असलेले विधेयक व इतर बाबींचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

जव्हार : भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून जव्हारमध्ये तहसील कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलन करण्यात आले. सहा महिने पुरेल इतका शिधा सोबत घेऊन शेतकरी आंदोलनाला उतरले आहेत. शेतकरीविरोधी विधेयकाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन जव्हार शहरात गोरवाडीनाका येथे रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जव्हार तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे देण्यात आले.

शेतकऱ्यांविरोधात असलेले विधेयक व इतर बाबींचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. ३० जुलै २०२० रोजी राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीतील विषयानुसार २,९४६ वनहक्क दावे निकाली काढून चार हेक्टर वनजमीन कसणाऱ्याच्या नावे करून वनपट्टेधारकांना ७/१२ व ८ अ नुसार जमिनी नावावर करा, संभाव्य वीजबिल विधेयक मागे घ्या, कोरोनाकाळात प्रत्येक गरजू कुटुंबाला दरमहा ७५०० रुपयांची थेट मदत केंद्र सरकारमार्फत मिळावी, आदी मागण्या केल्या.

केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या विधेयकाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खंडेश्वरीनाका येथे निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारचे जुलमी व हुकूमशाही असलेले शेतकरीविरोधी विधेयक रद्द करण्यासाठी तसेच दिल्लीच्या सीमेवर या विधेयकाला विरोधात लढा देत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ही निदर्शने करत असल्याचे किसान काँग्रेस संघाचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी सांगितले. वाडा येथील खंडेश्वरीनाका येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर चौधरी, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, का‌ँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष लोकेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष मुद्दसर पटेल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेती