वाढवण बंदर सर्व्हेसाठी आलेल्यांविरुद्ध संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:32 AM2020-11-25T00:32:43+5:302020-11-25T00:33:04+5:30

पोलीस ठाण्यात तक्रार : जनतेची मने वळवण्याचे प्रयत्न : महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आंदोलन उभारणार

Anger against those who came for the enhanced port survey | वाढवण बंदर सर्व्हेसाठी आलेल्यांविरुद्ध संताप

वाढवण बंदर सर्व्हेसाठी आलेल्यांविरुद्ध संताप

googlenewsNext

डहाणू/विरार : प्रस्तावित वाढवण बंदर उभारणाऱ्या जेएनपीटीविरोधात बंदर परिसरात जनक्षोभ भडकला असतानाच सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जेएनपीटीमार्फत येथील जनतेची मने वळविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याकरिता ठेका घेतलेल्या मुंबईच्या कंपनीचे काही लोक वाढवण बंदराच्या सर्व्हेकरिता आले.  याची माहिती स्थानिकांना कळताच येथील लोकांचा जनक्षोभ अधिकच भडकला आणि थोडा वेळ वातावरण तंग झाले. दरम्यान, वाढवण बंदर विकसित झाले तर मुंबईपासून पालघर, डहाणू, झाईपर्यंतचा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार असल्याने  महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीमार्फत आंदोलन उभारण्यात  येणार आहे. 

जेएनपीटीचे लोक वाढवण बंदराच्या सर्वेच्या कामासाठी आल्याचे कळताच तेथे आलेल्या गाडीला लोकांनी घेराव घातला आणि गाडीत बसलेल्या एका महिलेसह तीन जणांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडे कोणतीही परवानगी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना चिंचणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश विसे यांनी चौकशी केली असता त्यांना माजी नायब तहसीलदार पिरजादा यांच्या सांगण्याने बंदराच्या माहितीसाठी वरोरचे कोतवाल नंदू जाधव यांच्याकडे पाठविले असल्याची कबुली त्यांनी दिली. त्याप्रमाणे संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी गावकऱ्यांनी तक्रारी अर्ज दिला आहे.

दरम्यान, वाढवण बंदर विकसित झाले तर मुंबईपासून पालघर, डहाणू, झाईपर्यंतचा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होईल. त्यामुळे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन उभे केले जाईल. त्यास मच्छीमार बंधू-भगिनीनी साथ द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केले.

दरवर्षी २१ नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मच्छिमारांचा हा आनंदाचा, जल्लोशाचा दिवस असताना शासनातील मत्स्यव्यवसाय खात्यातील अधिकारी कशाकरिता आजच्या दिवशी शाश्वत मासेमारीच्या कार्यशाळा भरवितात, अशा सवाल किरण कोळी यांनी केला.
कार्यक्रमाचे निटनेटके आयोजन करणाऱ्या गावातील संस्थांचे त्यांनी कौतुक केले. तर फेसबुक, व्हाॅटसॲपवर मोठमोठ्या भाषा करणाऱ्यांनी समाजाच्या कार्यक्रमामध्ये व मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. दरम्यान, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी प्रस्तावना केली. तर विजय थाटू, फिलीप मस्तान, राजेन मेहेर, जयकुमार भाय, पूर्णिमा मेहेर इत्यादींची भाषणे झाली. व्यासपीठावर मोरेश्वर पाटील, ज्योती मेहर, उज्वला पाटील, गणेश भुर्की, इनास डेढू, सरपंच हेमलता बाळसी, उपसरपंच महींद्र पाटील इत्यादी होते.

जनजागृती यात्रा काढण्याचे आवाहन
जागतिक मच्छीमार दिन कार्यक्रम अर्नाळा कोळीवाडा, विरार येथे नुकताच आयोजित करण्यात आला. या वेळी प्रथम कोळी महिलांनी कांदळवन (तिवर) झाडांची बंदरपाडा खाडीवर पूजा-आरती करून व अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ केला. नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वाढवण बंदराविरोधात जनजागृती यात्रा काढण्याचे आवाहन केले.

Web Title: Anger against those who came for the enhanced port survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.