शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

...आणि सर्व्हेअरला झाली पळता भुई थोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:03 AM

बोर्डीतील गावदेवी वस्तीत शुक्र वार, ११ आॅक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका गाडीतून आलेल्या सहा-सात व्यक्तींनी सर्वेक्षण सुरू केले.

- अनिरुद्ध पाटील लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : शासनातर्फे विविध उपक्रमाबाबत सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगून खेडेगावात घरोघरी जाऊन काही तरुण कुटुंबियांची महत्त्वाची गोपनीय माहिती संकलित करतात. त्यानंतर त्याचा दुरुपयोग करून नागरिकांना गंडा घालतात, असा व्हॉट्सअपवर आलेला एक संदेश वाचून सतर्क झालेल्या बोर्डीतील एका गृहिणीने सर्व्हेअरचीच उलटतपासणी करून पोलिसांची भीती दाखवताच त्यांनी पलायन केले.

बोर्डीतील गावदेवी वस्तीत शुक्र वार, ११ आॅक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका गाडीतून आलेल्या सहा-सात व्यक्तींनी सर्वेक्षण सुरू केले. त्यापैकी एकजण भामिनी सावे यांच्या घरी गेला. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्या सासऱ्यांकडे तो कुटुंबीयांची चौकशी करू लागला.दरम्यान, गृहिणी असलेल्या भामिनी यांनी सकाळीच व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, सर्व्हेच्या नावाखाली गृहभेट देऊन फसवणूक करणाºया टोळी विषयीचा संदेश वाचला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या सावे यांनी त्याची उलटतपासणी करण्यास सुरुवात केल्याने तो गांगरला. शिवाय त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा विचार बोलून दाखवताच त्याला पळता भुई थोडी झाली.

या वस्तीत गेलेल्या अन्य साथीदारांना त्यांनी बोलावून तेथून पळ काढला. तर भामिनी यांनी याच वस्तीतील वृषाली सावे यांना फोनद्वारे घडला प्रकार सांगितला. त्यांनीही प्रसंगावधान राखून तत्काळ घोलवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती दिली. शिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून घटनाक्र म सांगणारा सतर्कतेचा मेसेज पाठविला.दरम्यान, अकराच्या सुमारास सर्व्हेअरची ही टीम लगतच्या चिखले गावात आली. येथे एका ग्रामस्थांच्या घरी ते गेल्यावर त्याने सर्व्हेअरचे ओळखपत्र आणि व्हिझिटिंग कार्डचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढले. शिवाय माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर साडेअकरच्या सुमारास त्यांनी व्हॉटस्अप उघडल्यावर बोर्डीतील महिलेने पाठवलेला संदेश वाचला.

असा अनुभव आपल्याला आल्याचा संदेश आणि घेतलेले फोटो त्यांनीही व्हॉटस्अप ग्रुपवर टाकले. मात्र, या सगळ्याचा फायदा या घटनेची चौकशी करणाºया घोलवड पोलिसांना झाला. त्यामुळेच तासाभरात या सर्व्हेअर टीमपर्यंत त्यांना पोहोचता आले.

व्हॉटसअ‍ॅप वादळावर पडला पडदाएका मीडिया हाऊससाठी हे काम करीत असल्याचे या सर्व्हेअरनी चौकशीत सांगितल्याची माहिती प्रभारी अधिकारी सोनावणे यांनी दिली. त्यानंतरच या व्हॉटस्अप वादळावर पडदा पडला. मात्र, तोवर या संदेशाने सर्वत्र बºयापैकी खळबळ उडवून दिली होती. या गृहिणीच्या जागरुकतेमुळे जरी गोंधळ उडाला असला तरी यामुळे सोशल मीडियावरील संदेश हे किती गंभीरपणे घेतले जातात, हे देखल लक्षात आले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया