सर्वच एटीएम मंगळवारपर्यंत राहणार बंद?
By Admin | Updated: November 11, 2016 02:51 IST2016-11-11T02:51:31+5:302016-11-11T02:51:31+5:30
जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत

सर्वच एटीएम मंगळवारपर्यंत राहणार बंद?
पालघर/नंडोरे : जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत. हा कालावधी मंगळवारपर्यंतचा असू शकतो अशी आॅफ दे रेकॉर्ड माहिती बँकांतूनच मिळू लागल्याने सर्वसामान्य हादरून गेले होते.
५०० व १०० रु पयांच्या नोटा चलनातून अचानक बंद करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे व पहिल्या दिवशी बँकांसह ए टी एम बंद असल्याने तसेच कोणीही या नोटा स्वीकारत नसल्यामुळे पालघरमध्ये आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.
दुसऱ््या दिवशी बँका सुरु होतील तेव्हा हाती पैसे येऊन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येईल या आहेत असलेल्या सर्वसामान्य माणसाची आज दुसऱ्या दिवशीही प्रचंड कोंडी झाली. बँकांमधून पैसे मिळविण्यासाठी तासंतास झालेली रखडपट्टी हा कामगार,मध्यमवर्गीय या साऱ्यांसाठी कष्टप्रद अनुभव राहिला पण रोज मजुरी करून आपलं पोट भरणाऱ्या मजुरांच्या कुटुंबासाठी मात्र आजचा दिवस उपासमारीचा ठरला. पैसे आहेत पण ते कुणी स्वीकरत नाहीत. यामुळे उधारी किंवा उपासमार हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्याला बसला असल्याचे यावरून दिसते आहे. काळा पैसा म्हणजे काय याची कल्पनाही नसलेल्या व कधीही काळा पैसा न बाळगणारा प्रामाणिक यात भरडून निघाला.
५०० व १००० रु पयांच्या या नोटा बँकेशिवाय कोणीही स्वीकारत नसल्यामुळे आज दुसर्या दिवशीही बाजारपेठा ,भाजी बाजार ,सराफ बाजार थंडावला होता याउलट या नोटा बँकेत जमा करण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी कधीही दिसले नाही अशी अलोट गर्दी बँकांसमोर आज दिसली. या गर्दीला तोंड देता देता बँकाची भंबेरीच उडाल्याचे चित्र दिसले. पैसे काढण्यापेक्षा पैसे जमा करण्यासाठी लोक आज घाई करत होते. एरवी कधीही वेटिंगवर न राहणारेसुद्धा आज पैसे बदलून घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे होते. आज बँकांकडून कमी का असेना फक्त 1000 रु पयांच्याच नोटा ग्राहकांना मिळत होत्या त्यामुळे रोजचा व्यवहार तरी सुकर होईल अशा भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या.
पोस्ट आॅफिस बरोबरीने पालघरमधील अर्ध्या डझनहून अधिक बँका आज हाऊसफुल्ल झाल्या होत्या.कधीही नसेल तसा आज बँकांमध्ये ५०० व १००० रु पयांच्या नोटांचा खच पाहावयास मिळाला . बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने बँक कर्मचाऱ्यांंचीही दमछाक झाली .नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून या पुढे मिहनाभर बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघड्या राहणार आहेत. बँका चालू असल्या तरी एक दोन दिवस पैसे येईपर्यंत ए टी एम मात्र बंद राहणार असल्याचे कळते आहे. (वार्ताहर)