चोर समजून विद्यार्थ्यावर अ‍ॅसिडहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 05:30 IST2017-10-06T05:30:46+5:302017-10-06T05:30:56+5:30

विरारमध्ये एका मुलावर चोर समजून अ‍ॅसिडहल्ला झाला. विरार पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला

Aidhahalla students understand the thief | चोर समजून विद्यार्थ्यावर अ‍ॅसिडहल्ला

चोर समजून विद्यार्थ्यावर अ‍ॅसिडहल्ला

वसई : विरारमध्ये एका मुलावर चोर समजून अ‍ॅसिडहल्ला झाला. विरार पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. राहुल बावस्कर असे त्याचे नाव आहे. दस-याच्या आदल्या रात्री त्याला मित्रांसोबत गरबा खेळण्यासाठी जायचे नव्हते. म्हणून तो घराशेजारच्या गल्लीत एका घराजवळ तो लपला. तेव्हा त्याच्यावर पाण्यासारखा द्रवपदार्थ फेकला. घरी येऊन पाहिले असता अ‍ॅसिड फेकल्याचे समजले. त्याच्या पाठ, चेहरा, मान, हातावर जखमा आहेत. राहुल लपलेल्या गल्लीत पेट्रोल चोरीच्या घटना होत असल्याने चोर समजून असे केल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला.

Web Title: Aidhahalla students understand the thief

टॅग्स :Crimeगुन्हा