After three months, Money deposit in the Farmer's account, satisfaction in among farmers | बळीराजाच्या खात्यात तीन महिन्यांनी पैसे जमा, शेतकऱ्यांत समाधान

बळीराजाच्या खात्यात तीन महिन्यांनी पैसे जमा, शेतकऱ्यांत समाधान

पारोळ - भात खरेदी केंद्रावरील भात खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांनंतर जमा झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘लोकमत’ने १३ मार्चच्या अंकात ‘भात खरेदी केंद्राचा आधार हरपला’ अशी बातमी प्रकाशित केली होती. त्याचा परिणाम म्हणून आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी केंद्रावर भात दिलेल्या शेतक-यांचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे भात पिकाचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकरी वर्गाने दै. ‘लोकमत’चे आभार मानले.

सरकारने थकीत कर्जमाफी व नियमित हप्ते भरणाºया शेतकºयांना अनुदान दिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असतानाच वसई तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर तीन महिन्यांपासून भात खरेदी केलेले असताना त्या खरेदीचे पैसे हातात न आल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण होते. होळी सण साजरा करायला तरी भात खरेदीचे पैसे मिळतील या आशेवर शेतकरी असताना सणाच्या दिवसातही खात्यात पैसे जमा न झाल्याने शेतकरी नाराज होते. भात खरेदी केल्यानंतर पंधरा दिवसात धान खरेदीचे पैसे शेतक-याच्या खात्यात जमा होतात. पण या वर्षी मात्र शेतकºयांकडून भात खरेदी केल्यानंतर लगेच आॅनलाइन नोंदणी व पावती देणे बांधनकारक असताना पावती देण्यासाठीही अधिकाºयांनी पंधरा दिवस लावले. त्यामुळे भात खरेदीचे पैसे येण्यास उशीर झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमी भाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ७०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब ठरली होती. काही शेतकºयांनी २४ डिसेंबरला भात खरेदी केंद्रावर भाताची विक्री केली होती. पण त्या विक्रीचे पैसे तीन महिने झाले तरी खात्यात जमा न झाल्याने शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तर मार्चअखेर आल्याने अनेक शेतकºयांना सोसायटीकडून घेतलेले पीक कर्ज भरायचे होते. अशा चिंतेत शेतकरी असतानाच ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्याने महामंडळाने तत्काळ याची दखल घेत शेतकºयांच्या खात्यात भात खरेदीचे पैसे जमा करण्यात आले.

मी डिसेंबर महिन्यात भात खरेदी केंद्रावर भात विक्री केले होते. ते पैसे मार्चमध्ये ‘लोकमत’ने दिलेल्या बातमीमुळे मिळण्यास मदत झाली असल्याने व नेहमी शेतकरी वर्गासाठी या दैनिकाची मदत होत असल्याने ‘लोकमत’चे आभारी आहोत.
-कृपेश पाटील, शेतकरी, वडघर

Web Title: After three months, Money deposit in the Farmer's account, satisfaction in among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.