अॅसिड हल्ला करणारा तीन दिवसानंतरही मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:57 IST2019-05-31T22:56:45+5:302019-05-31T22:57:00+5:30
हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला आहे का? त्याची पोलिसांनी चाचपणी करण्यास सुरवात केली असून दोघांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविले आहेत.

अॅसिड हल्ला करणारा तीन दिवसानंतरही मोकाट
नालासोपारा: मुंबईच्या दहिसर परिसरात राहणाऱ्या पुरुष आणि स्त्री या जोडप्यावर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणी तीन दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला आहे का? त्याची पोलिसांनी चाचपणी करण्यास सुरवात केली असून दोघांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविले आहेत.
दहिसर येथील कांदरपाडा येथे राहणारे अविनाश वीरेंद्रकुमार तिवारी (४१) आणि सीमा विश्वकर्मा (३८) हे दोघे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी मोटार सायकल रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक समोर आलेल्या एका अनोळखी इसमाने दोघांवर अॅसिड फेकले. तिवारी लगेच जवळच्या पेट्रोलपंपाजवळ गेले आणि तिथे असलेल्या लोकांनी पाणी मारून अॅसिडची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र ते अॅसिडमुळे गंभीर भाजल्याने त्या दोघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला नेत असताना वाटेतच तिवारी यांचा मृत्यू झाला.