सोलापूर, नाशिक, संभाजीनगरनंतर पालघरमधील फार्म हाऊसवर धाड, धाडसत्रत कोट्यवधींचे साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 12:06 IST2023-10-23T12:04:25+5:302023-10-23T12:06:14+5:30
या फार्म हाऊस मधील घरात सुरू असलेल्या कारखान्यात मेफेड्रिन नामक मादकद्रव्य बनविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

सोलापूर, नाशिक, संभाजीनगरनंतर पालघरमधील फार्म हाऊसवर धाड, धाडसत्रत कोट्यवधींचे साहित्य जप्त
हितेन नाईक -
पालघर : सोलापूर, नाशिक, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसमधील बंद वजा घरावर मिराभाईंदर येथील गुन्हे शाखा विभागाने रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास धाड टाकली. या फार्म हाऊस मधील घरात सुरू असलेल्या कारखान्यात मेफेड्रिन नामक मादकद्रव्य बनविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
रविवारी रात्री अत्यंत गोपनीय रित्या ही कारवाई करण्यात येत असताना स्थानिक पोलिसांना मात्र ह्या कारवाईची पुसटशीही कल्पना नसल्याचे दिसून आले. ह्या धाडसत्रत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. औद्योगिक वसाहती मधील बंद असलेले कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन उभारण्यात आलेल्या युनिटमधून मेफेड्रिन बनविले जात असल्याची बाब या पूर्वी पालघर, बोईसर येथील घटनेमधून सिद्ध झाली आहे.
ह्या मेफेड्रिन बनविण्याच्या गोरखधंद्यात स्थानिक विज्ञान शाखेशी(सायन्स) संबंधित तरुणांना लाखो रुपयांचे आमिषे दाखवली जात असल्याचेही समोर आले आहे. ह्या प्रकरणातील काही आरोपींना वसई मधून अटक करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.