शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:14 PM

विजयी उमेदवाराचे मताधिक्य मात्र घटले

पंकज राऊतबोईसर : पालघर तसेच डहाणू विधानसभा मतदारसंघाची विभागणी करून २००९ मध्ये बोईसर विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवला आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या तीनही निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतविभागणीचा फायदा होऊन सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आला. मात्र, बविआला विजय मिळत असला तरी प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य घटत आहे. शिवसेना, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष (भाजप बंडखोर) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बविआचे उमेदवार राजेश पाटील यांचा २७५२ मताधिक्याने विजय झाला आहे.प्रचारातील मुद्दे, आरोप - प्रत्यारोप गाजलेया निवडणुकीच्या प्रचारात नेहमीप्रमाणेच विकासकामांची गाजरे दाखवण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना, बविआ आणि अपक्ष उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर झाली. सेनेचे उमेदवार गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा तसेच एमएमआर क्षेत्र पालघर तालुक्यापर्यंत विस्तारित करण्यासाठी आणि महत्त्वाच्या रस्त्यांसाठी पाठपुरावा केल्याचे सांगत होते तर उर्वरित दोन प्रमुख उमेदवार तरेंनी दहा वर्षात काय विकासकामे केली हे सांगण्यासोबतच त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नाही, असा आरोप करून आम्ही सर्व भागांमधील घटकांना योग्य न्याय देऊन विकासकामे करू आणि नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध राहू असे आश्वासन देत होते.ठाकरेंच्या सभेचा फायदा झाला नाही ?शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोर तसेच नालासोपारा येथे बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसईच्या सेनेच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. मात्र यापैकी केवळ पालघरचेच उमेदवार निवडून आले. उर्वरित तीनही उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची मते आणि मताधिक्य२००९ मध्ये बविआचे विलास तरे ५३,७२७ मते मिळवून १३, ०७८ मताधिक्याने विजयी झाले.२०१४ मध्ये पुन्हा विलास तरे ६४, ५५० मते मिळवून १२, ८७३ मताधिक्याने निवडून आले.तर २०१९ च्या निवडणुकीत बविआचे राजेश पाटील यांनी ७८, ७०३ मते मिळवून २७५२ मताधिक्याने निवडून आले. म्हणजेच विजयी उमेदवारांचे मताधिक्य प्रत्येक वर्षी कमी होत आहे. विशेष बाब म्हणजे या तीनही निवडणुकांमध्ये बविआच्या उमेदवाराला मतविभागणीचा फायदा झाला आहे.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019