वसईतील अवैध गणेश मंडळांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 05:46 IST2018-08-31T05:45:49+5:302018-08-31T05:46:33+5:30
परवानगी मस्ट : त्याशिवाय मंडप नाही

वसईतील अवैध गणेश मंडळांवर होणार कारवाई
विरार : गणेशोत्सव पुढच्या महिन्यात येत आहे आणि त्यामुळे जागोजागी गणेशोत्सव मंडळे आपल्याला पाहायला मिळतात त्यातली बरीच अवैध असतात. या मंडळांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मात्र अशा मंडळावर आता महापालिकने बंधन घातले आहेत. ज्या गणेशोत्सव मंडळांनी परवानगी शिवाय मंडप उभारले असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे महापालिकेने ठरविले आहे.
गणेशोत्सवात कोणती खबरदारी घ्यावी यासाठी एक बैठक महापालिकेने घेतली होती. त्यात महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, आयुक्त सतीश लोखंडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, माजी उपमहापौर उमेश नाईक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय सागर, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड सर्व विभागांचे पोलीस निरीक्षक महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची तर सार्वजनिक मंडळांना आवश्यक परवानग्या घेण्याच्या सूचना, तर रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याच्या बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे आवाहन
च्येणारा गणेशोत्सव हा नीट, सुरळीत पार पडावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न चालूच आहेत, मात्र नागरिकांनी व गणेश मंडळांनी ह्या सर्व गोष्टींमध्ये सहकार्य द्यावे असे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.