हॉटेलमध्ये फिरायला आलेल्या तरुणाकडील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:57 IST2025-05-30T14:56:56+5:302025-05-30T14:57:28+5:30
Crime News: पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका हॉटेलवर बोईसर मधील एक मुलगा आणि मुलगी फिरण्यासाठी आलेली असताना मुलाच्या जवळील गावठी कट्ट्यातून निघालेली गोळीने मुलीचा वेध घेतला.

हॉटेलमध्ये फिरायला आलेल्या तरुणाकडील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी
- हितेन नाईक
पालघर - पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका हॉटेलवर बोईसर मधील एक मुलगा आणि मुलगी फिरण्यासाठी आलेली असताना मुलाच्या जवळील गावठी कट्ट्यातून निघालेली गोळीने मुलीचा वेध घेतला. ह्या प्रकरणात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला प्रथम माहीमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर पालघरचे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिची तब्येत अत्यवस्थ झाल्याने तिला पुढील उपचारासाठी बोईसर येथील एका खाजगी रुग्णाण्यात नेण्यात आले आहे.
केळवे सागरी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून मुलीने चुकून हा गावठी कट्टा हाताळत असताना चुकून गोळी झाडून ही मुलगी जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीला पोलीस आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी पोलीस करीत असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले. स्थानिक मुलांकडे मिळालेल्या गावठी कट्ट्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचे हे एक उदाहरण असल्याने पोलिसांनी या संदर्भात कडक भूमिका घ्यावी अशी मागणी पालघर वासियांकडून केली जात आहे.