तलासरीत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी केला बलात्कार; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:14 IST2024-05-08T14:14:31+5:302024-05-08T14:14:52+5:30
इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्याला भेटायला आलेल्या दोन तरुणांनी तलासरी येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तलासरीत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी केला बलात्कार; आरोपी अटकेत
पालघर - इंस्टाग्रामवर ओळख झाल्या नंतर त्याला भेटायला आलेल्या दोन तरुणांनी एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर आरोपीची ओळख झाली व त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाल्याने भेटीगाठी सुरू झाल्या. दरम्यान त्याने आपली अल्पवयीन प्रेयसी ला 30 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या घरी बोलावले. यावेळी अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पाच एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी तरुण अल्पवयीन मुलीला घेऊन मित्राच्या शेतावर आला व त्या ठिकाणी या दोघांनीही जबरदस्ती करत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या घरी ही गोष्ट कळल्यावर सोमवारी आपल्या कुटुंबीयांसह पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस ठाणे गाठत आपली फिर्याद दाखल केली. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भा.द.वि.स. कलम 376, 376 (2) (एन), पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.