शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात ८ ग्रा.पं. बविआने जिंकल्या

By admin | Updated: April 19, 2016 01:47 IST

या तालुक्यातील ११ पैकी ८ जागांवर निविर्वाद वर्चस्व मिळवत बहुजन विकास आघाडीने तालुक्यावरील वर्चस्व कायम राखले आहे.

शशी करपे,  वसईया तालुक्यातील ११ पैकी ८ जागांवर निविर्वाद वर्चस्व मिळवत बहुजन विकास आघाडीने तालुक्यावरील वर्चस्व कायम राखले आहे. चंद्रपाड्यात मात्र गेल्या पाच वर्षात पाच सरपंच द्याव्या लागलेल्या बहुजन आघाडीला सत्ता गमवावी लागली आहे. याठिकाणी शिवसेनेने सत्ता काबिज केली आहे. सकवारमध्ये त्रिशंकू स्थिती असून पोमणमध्ये सर्वपक्षीय आघाडीने सत्ता काबिज केली आहे. वसईतील ११ ग्रामपंचायतींच्या एकूण जागांपैकी भाताणे आणि शिरवली ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी दोन जागांवर बिनविरोध निवड झाली होती. उरलेल्या जागांपैकी बहुजन विकास आघाडीने ८३ जागा पदरात पाडून ११ पैकी आठ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने चंद्रपाडा ग्रामपंचायत जिंकण्यासोबत एकूण १८ उमेदवार निवडून आणले आहेत. श्रमजीवी संघटनेला १७ जागा जिंंकता आल्या. तर भाजपाला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह इतर पक्षांना खातेही उघडता आले नाही. तालुक्यातील शिरवली, शिवणसई, खानिवडे, भाताणे, उसगाव, मेढे - वडघर, आढणे - भिनार, देर्णेली, माजीवली - देपीवली, सकवार, पोमण आणि चंद्र पाडा या अकरा ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झाले होते. सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयात निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. बविआने भाताणे, शिवणसई, शिरवली. मेढे-वडघर, उसगाव, खानिवडे, आडणे-भिनार, माजिवली-देपीवली या आठ ग्रामपंचायती जिंकल्या. सकवार ग्रामपंचायतीत ११ जागांपैकी बविआला ५ जागांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी श्रमजीवी आणि भाजपाने प्रत्येकी तीन-तीन जागा जिंकल्या. याठिकाणी त्रिशंकु अवस्था झाल्याने बविआला सत्ता स्थापनेसाठी श्रमजीवी किंवा •भाजपाशी हातमिळवणी करावी लागणार आहे. किंवा श्रमजीवी आणि भाजपा युती झाल्यास बविआला सत्तेपासून दूर जावे लागणार आहे. पोमण ग्रामपंचायतीमध्ये बविआ, भाजपासह इतर पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ग्रामसेवा मित्र मंडळाने सत्ता मिळवली आहे. बविआला चंद्रपाडा ग्रामपंचायत मात्र गमावावी लागली आहे. १७पैकी १३ जागा जिंकून शिवसेनेने याठिकाणी सत्ता खेचून आणली आहे. बविआला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. पाच वर्षे सत्ता असताना बविआला पाच सरपंच द्यावे लागले होते. त्यातूनच बविआला फटका बसल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी) हुसेन मेमन ल्ल जव्हारतालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. तालुक्यात नंबर वनसाठी राष्ट्रवादी व बीजेपीत चुरस झाली आहे. एकूण ५० ग्रामपंचायतींपैकी जामसर व बरवाडपाडा येथे ग्रामदान मंडळे आहेत. तर वावर व बोपदरी या दोन ग्रामपंचायतींतील निवड बिनविरोध करण्यात आली आहे. त्यामुळे ४५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूका घेण्यात आल्या होत्या.त्यातील वाळवंडा या ग्रामपंचायतीची निवडणूक पंचवार्षिकला अगोदर झाली आहे. यामध्ये ४५ ग्रामपंचायतींची मतमोजणीत करण्यात आली आहे. यामध्ये बीजेपी- १३, राष्ट्रवादी- १३, शिवसेना- ७, बहुजन विकास आघाडी- ७, सीपीएम-५, असा ग्रामपंचायत निवडणुकीचा कल मतदारांनी दिला, या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळाली.जव्हारमध्ये गेल्या २५ वर्षांपासून कोगदा व जुनीजव्हार या ग्रामपंचायती शिवसेनेकडे होत्या. मात्र या दोन्ही ग्रामपंचायतील मतदारांनी बदल करून तेथील सत्ता राष्ट्रवादी व बहुजन विकास आघाडीच्या हाती सोपविली आहे.मात्र तालुक्यात कोणता पक्ष मोठा हे चित्र सरपंच निवडले गेल्या नंतरच समजेल. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार -जयराज सूर्यवंशी यांनी काम चोख बजावले तर पोलीस निरीक्षक केशवराव नाईक, व इतर पोलीस बंदोबस्त यांनी घटना घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.> वाडा तालुक्यात परिवर्तन, कुडूस काँग्रेसकडेवसंत भोईर ल्ल वाडातालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी विरोधात जनतेने कौल दिला असून बहुतेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून संपूर्ण तालुक्यात परिवर्तनाची लाट आली आहे. कुडूस ग्रामपंचायतीत काँग्रेसचे १५ पैकी १२ सदस्य निवडून आले आहेत. संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेची अशी कुडूस ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच मिलिंद चौधरी यांचा पराभव झाला असून त्यांच्या पॅनलला खाते देखील उघडता आले नाही. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते •भगवान चौधरी विजयी झाले असून त्यांच्या पॅनलचे तीन सदस्य निवडून आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इरफान सुसे यांच्या १५ पैकी १२ जागा निवडून येऊन त्यांनी निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे.नारे ग्रामपंचायतीत भाजपाचे नेते कुंदन पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला असून सुधीर पाटील यांच्या परिवर्तन एकता पॅनलच्या ९ पैकी ९ जागा निवडून आल्या आहेत. तर गोऱ्हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल खिलारे यांचा पराभव झाला असून महेश चौबल यांच्या गोऱ्हे विकास पॅनलने ९ पैकी ८ जागांवर विजय मिळविला आहे. खरिवली ग्रामपंचायतीत पंचायत समिती सदस्य अरूण अधिकारी यांच्या पॅनलचा पराभव झाला असून शिवसेनेमधीलच त्यांचे विरोधक शरद अधिकारी यांच्या पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकून विजय संपादन केला तर ऊसर ग्रामपंचायतीत ग्राम विकास पॅनलने ७ पैकी ५ जागा जिंकुन संघर्ष पॅनलचा पराभव केला. बिलोशी ग्राामपंचायतीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. कांबारा ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलने ९ पैकी ६ जागा जिंकुन विजय मिळविला आहे. देवघर ग्रामपंचायतीत विनोद पाटील यांच्या एकजुट पॅनलने ७ पैकी ४ जागांवर विजय मिळविला आहे.बालीवली ग्रामपंचायतीत भाजपाचे किशोर वेखंडे यांचा ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ७ जागा जिंकुन पराभव केला आहे. गुंडा ग्रामपंचायतीत भाजपाचे मोहन पवार यांच्या पॅनलने ७ पैकी ५ जागा जिंकुन बहुमत मिळविले आहे. बिलावलीत •भाजपाच्या केशव पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला असून खरिवलीत मनसेचे कामगार नेते सदाशिव बागूल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तालुक्यातील मोज, पालसई, हारोसाळे, सारसी, चिखले, कोने, हुणावे, डाकिवली, सापने, आंबिटघर, तिळगांव, नांदणी, केळठण, कळंभ, पोशेरी, गारगांव, खरिवली या तालुक्यातील सतरा ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या असल्याची माहिती पालघर जि. प. चे गटनेते निलेश गंधे यांनी दिली. तर वाड्यातील सोनाळा, कासघर, दादडे, उजन्नी, ओगद, पाचघर, तुसा, तिळगांव, खानिवली, पालसई, वावेघर आदी २१ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्याची माहितीपांडुरंग पठारे यांनी दिली. मोखाड्यात कमळभाजपाने मिळविल्या सर्वाधिक जागा : आसे खोडाळावर भगवा मात्र बालेकिल्ल्यात पराभवच्मोखाडा तालुक्यात पार पडलेल्या १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजपाने चौफेर फटकेबाजीत करून १८ पैकी ११ हून अधिक ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण केले असून राष्ट्रवादीने आपले गड कायम राखले आहेत तर आसे आणि खोडाळा या मोठ्या ग्रामपंचायतीवर सेनेने आपली सत्ता कायम राखली असली तरी काही ठिकाणी हक्काच्या बालेकिल्ल्यात तिला हार पत्कारावी लागली आहे. एकूणच भाजपाने तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये आपले वर्चस्व सिध्द केले आहे. च्तालुक्यात झालेल्या १८ ग्रामपंचायतच्या निवडणूकीत ११ हून अधिक ग्रामपंचायतीवर भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले असून बेरीस्ते हिरवे हा राष्ट्रवादीने आपला गड कायम राखला आहे तर आसे आणि खोडाळा या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सेनेने कायम प्रस्थापित केले असले तरी या निवडणूकीत सेनेला जोरदार झटका बसला आहे. च्वाशाळा शिवली धामणशेत या त्यांच्या बालेकिल्ल्यात त्याना पराजयाला सामोरे जावे लागले आहे. तर खोडाळा आणि सावर्डे ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेवर दोन्ही उमेदवाराना सम समान मते पडाल्याने तो निर्णय बाकी आहे. मतदान आणि मतमोजणीच्या दोन्ही प्रक्रीया शांततेत पारपडल्या असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार जयराज सूर्यवंशी यानी पाहीले. > १८ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्वराहुल वाडेकर ल्ल विक्रमगडतालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या १४२ प्रभागातील ३१२ जागांपैकी ६३ उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. विक्रमगड ग्रामपंचायतीमधून कुणाही उमेदवारांने अर्ज दाखल केलेला नव्हता. तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ७५.९ टक्के मतदान झाले. विक्रमगड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीवर भाजपाला वर्चस्वी कायम राखता आले असून भाजपाकडून २५५ उमेदवार रिंगणात होते त्यापैकी १७० उमेदवार निवडून आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष संदिप पावडे यांनी दिली़. इतर ग्रामपंचायतींवर माकपा, शिवसेना व इतर पक्षांची आपली पकड निर्माण केली आहे़ या निवडणुकांत भाजपा, माकपा व शिवसेना यांच्यातच खरी लढत दिसली़ दरम्यानच्या काळात विजयी उमेदवारांच्या मिरवणुका व अभिनंदन सोहळे यामुळे सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्या ग्रामपंचायतीत कुठल्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले याबाबतची अधिकृत माहिती मंगळवारपर्यंत हाती येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. तर सर्वच राजकीय पक्षांनी अनेक ग्रामपंचायतीत आली सत्ता आल्याचे दावे, प्रतिदावे केले आहेत. डोल्हारी बु ग्रामपंचायतीवर गेल्या ४५ वर्षापासुन माकपाची निर्विवाद सत्ता होती. या ग्रामपंचायतीत माकपाचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची परंपरा होती मात्र ही परंपरा यंदा मोडीत निघाली असून या ग्रामपंचायतीमध्ये यंदा ११ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये ८ जागांवर माकपाचे उमेदवार विजयी झाले तर पहिल्यांदाच इतर तीन उमेदवार विजयी झाले आहेत़त्यामध्ये माकपाचे मातबगार उमेदार किरण गहला वॉर्ड क्र ४ड तर विलास गहला वॉर्ड क्र २ ब मधून पराभूत झाले आहेत़यावेळी शेतकरी किसन सभा महाराष्ट् राज्य सदस्य व तालुका अध्यक्ष राजा गहला यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले की, आम्ही आजपर्यत गेल्या ४५ वर्षात बिनविरोध निवडणूक लढवीत आले आहेत़ परंतु इतर लोकांच्या सांगण्यावरुन आमच्यामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्न झाल्याने ही परंपरा मोडली आहे़ मात्र आम्ही आमच्या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यत अनेक विकास कामे केली आहेत़ यापुढेही करूदरम्यानच्या काळात सर्वत्र शांततामय वातावणात मतदान पार पडले असुन कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले़ या निवडणुकांत विक्रमगड तालुक्यातील विक्रमगढ शहर वगळता ३५ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवणुकापैकी २० ग्रामपंचायतीवर ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाडयातील अनुसुचित जमातीच्या महिला सरपंच पदी विराजमान होणार आहेत़ दरम्यानच्या काळाता आता तयारी सरपंच पदासाठी़> सफाळ्यात बविआया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे १७ ही उमेदवार चांगल्या मताने निवडून आलेत. गेल्या १५ वर्षापासून बहुजन विकास आघाडीचेच वर्चस्व या ग्रामपंचायतीवर आहे. क्रीडा महोत्सवातून बहुजन विकास आघाडीने तरूणाईमधील स्तुप्त गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा व मंच निर्माण केला आहे. तसेच सफाळ्याचा झपाट्याने विकासही होत आहे. त्याचा फायदा आघाडीला मिळाला.या कालावधीमध्ये मुख्य रस्त्याचे रूंदीकरण, रस्त्याच्या दोन्ही बाजूस पक्की गटारे, सर्व अंतर्गत काँक्रीट रस्ते व पथदिवे, मुख्य रस्त्यांवर सोडियम व्हेपर लाईट, गावांमध्ये येणाऱ्या खाऱ्या पाण्यास अडविण्यासाठी बंधारा, मार्केट परिसरात सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था, सुशोभित उद्याने ही कामे या १७ वर्षाच्या काळात करण्यात आलेली आहेत.सफाळे ग्र्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असलेल्या शुद्ध पेयजल योजना हा उपक्रम खरोखरच एक आदर्श आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीमध्ये होरपळत असताना हा प्रकल्प त्यांच्यासमोर एक आदर्श प्रकल्प म्हणून उभा आहे. विजयी झालेले उमेदवार राजेश (बंटी) म्हात्रे, कल्पक मानकर, राखी चौधरी, निलीमा •भोईर, यीया शिवगण, अमोद जाधव, राजेश पाटील, ज्योती भुयाळ, आरती पाटील, पुजा कामडी, विजय मेठा, लतेश बढे, अश्विनी जाधव, रुपेश धांगडा, दिपीका हेमाडे, तनुजा घरत, भुनेश पाटील या उच्च सुशिक्षित तरूण, तरूणी एकत्र येऊन सफाळ्याच्या विकासाचे नियोजन करणार आहेत. >>