पालघरमध्ये ५० हजार बोगस मतदारांची नोंद , वाढीबाबत साशंकता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 11:32 PM2019-09-28T23:32:03+5:302019-09-29T00:22:47+5:30

निवडणुकीत बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचे फॅड वाढत चालले असून लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार ८३३ मतदारांच्या झालेल्या वाढीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

50 thousand fakevoters registered in Palghar | पालघरमध्ये ५० हजार बोगस मतदारांची नोंद , वाढीबाबत साशंकता

पालघरमध्ये ५० हजार बोगस मतदारांची नोंद , वाढीबाबत साशंकता

Next

- हितेन नाईक
पालघर : निवडणुकीत बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचे फॅड वाढत चालले असून लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार ८३३ मतदारांच्या झालेल्या वाढीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अशा बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत आक्षेप नोंदवूनही कारवाई होत नसल्याने पालघरमधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली असताना काही विधानसभा मतदारसंघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्रम नोंदविण्यात आला होता. त्यामुळे या विक्रमाबाबत साशंकता व्यक्त करीत बविआचे उमेदवार व माजी खासदार बळीराम जाधव यांनी नवीन मतदारांची नोंद कोणत्या विधानसभा क्षेत्रात झाली, त्यांनी कुठे मतदान केले याची माहिती मागत जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत मतमोजणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात उशिरापर्यंत ठाण मांडले होते.

पालघर नगरपालिकेच्या २०१९ च्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाची नोंद करण्यात आल्याचे पुरावे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, गटनेते कैलास म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील आदींनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयासह निवडणूक आयोगाकडे दिले होते. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवत पालघर न्यायालयात याचिकाही दाखल केलेली आहे. या बोगस मतदार नोंदणी संदर्भातील तक्र ारी केल्यानंतर त्याची मागितलेली माहिती ही वेळीच दिली जात नाही.
नालासोपारा मतदारसंघातही तब्बल १ लाखाहून अधिक मतदारांची नावे बोगसपणे नोंदण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. अंधेरी, ठाणे, मीरा-भार्इंदर आदी भागातील मतदारांची नावे बोगसरित्या नोंदविण्यात आली असून याचा छडा लावण्यासाठी माजी महापौर नारायण मानकर यांनी लेखी तक्र ारही केली आहे.
बोगस मतदारनोंदणी करताना बोगस रेशनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत झाला असून पालघर तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचारी व महा ई-सेवा केंद्रातील काहींचा यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस विभागाची टीम या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याच्या अंतिम टप्प्यावर असताना त्यांना तालुका मतदारनोंदणी अधिकारी वर्गाकडून मागणी केलेली कागदपत्रे पुरवण्यास चालढकल केली जात असल्याचे समोर आले आहे. आम्हाला हवी असलेली कागदपत्रे आमच्या हाती मिळाल्यास या मागच्या षडयंत्राचा पर्दाफाश करणे आम्हाला सहज शक्य होईल, असे एका पोलीस अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला माहिती दिली.
जिल्ह्यात मतदार नोंदणीची परंपरा आणि कार्यपद्धती विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाल्याने १५ जुलै ते आॅगस्ट अखेरीपर्यंतच्या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत ५० हजार ८३३ मतदारांची संख्या वाढली आहे.

अशी झाली मतदारनोंदणी
मतदान नोंदणी करताना दोन विशेष कार्यक्र म राबविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर डहाणू विधानसभा मतदारसंघात ११२० मतदार, विक्र मगड मतदारसंघांमध्ये २१५२ मतदार, पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये २४२४ मतदार, बोईसर विधानसभा मतदारसंघांमध्ये १२ हजार ७२३ मतदार, नालासोपारा मतदारसंघामध्ये सर्वाधिक २४ हजार ७९७ मतदार तर वसई विधानसभा मतदारसंघांमध्ये ७६१७ अशा एकूण ५० हजार ८३३ मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Web Title: 50 thousand fakevoters registered in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.