विरारमध्ये 31 वर्षीय बांधकाम व्यवसायकाची निर्घृण हत्या; धारधार हत्याराने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 11:43 IST2021-09-06T11:43:17+5:302021-09-06T11:43:34+5:30
विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला आहे.

विरारमध्ये 31 वर्षीय बांधकाम व्यवसायकाची निर्घृण हत्या; धारधार हत्याराने केले सपासप वार
नालासोपारा :- विरारमध्ये 31 वर्षीय बांधकाम व्यवसायकाची सोमवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास धारधार हत्याराने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
विरारपोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून कोणी व का हत्या केली याचा विरार पोलीस शोध व तपास करत आहे.