अनधिकृत राहणाऱ्या २३१ नायजेरियन नागरिकांची धरपकड; नायजेरियनच्या ४० अनधिकृत दुकानांवर पोलिसांची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:58 IST2026-02-04T17:57:43+5:302026-02-04T17:58:15+5:30

तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागे काही दिवसांपासून केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांसह अनेक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते.

231 Nigerian citizens arrested for illegally staying; Police raid 40 unauthorized shops of Nigerians | अनधिकृत राहणाऱ्या २३१ नायजेरियन नागरिकांची धरपकड; नायजेरियनच्या ४० अनधिकृत दुकानांवर पोलिसांची धाड

अनधिकृत राहणाऱ्या २३१ नायजेरियन नागरिकांची धरपकड; नायजेरियनच्या ४० अनधिकृत दुकानांवर पोलिसांची धाड

- मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा - शहराच्या पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीततील इमारतीमध्ये नायजेरिया, घाना, युगांडा या देशातील नायजेरियन नागरिकांनी अनधिकृतपणे थाटलेल्या ४० अनधिकृत दुकानांवर पोलिसांनी व मनपाने संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांनी याठिकाणी अनधिकृत राहणाऱ्या तब्बल २३१ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. परिमंडळ दोनच्या तुळींज, आचोळे, वालीव, नायगांव, माणिकपूर, वसई या सहा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अनेक टीम बनवून बुधवारी सकाळी धाड मारली. या ठिकाणाहुन २ करोड रुपये किंमतीच्या दोन किलो कोकेनसह २३१ नायजेरियन नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. काही इमारतीत नायजेरियन नागरिकांनी ब्युटी पार्लर, कपडे, चायनीज, किराणा, सलून आणि बार थाटले होते. यावर पोलिसांनी मनपाच्या माध्यमातून कारवाईही केली आहे. एकूणच या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागे काही दिवसांपासून केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांसह अनेक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यावर अंकुश लावण्यासाठी व बेकायदेशीर राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांच्या विरोधात बुधवारी पहाटे ६ वाजल्यापासून परिमंडळ दोनमधील पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन केले होते. यावेळी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस ठाण्याचे प्रभारी, महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, मसुब कर्मचारी असा मोठा पोलीस फौजफाटा घेऊन बुधवारी पहाटे तुळींज पोलीस ठाण्याच्या प्रगती नगर, रेहमत नगर, मोरेगाव या परिसरात पोहचले. पोलिसांनी त्या परिसरात राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांना वैध व्हिजा, पासपोर्ट व इतर कागदपत्रे दाखवण्यासाठी आव्हान केले. पण एकानेही कागदपत्रे न दाखवल्याने पोलिसांनी नायजेरियन नागरिकांना पकडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ११५ पुरुष, ९८ स्त्रिया आणि १८ अल्पवयीन मुले असे तब्बल २३१ नायजेरियन नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान महेश अपार्टमेंटमधील एका नायजेरियन महिलेकडून २ करोड रुपये किंमतीचे २ किलो कोकेन पकडण्यात आले आहे. 

मनपा बी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांनी ३० मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने नायजेरियन नागरिकांनी अनधिकृतपणे थाटलेल्या ४० दुकानामधील मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे.

ज्या विदेशी नागरिकांकडे व्हिजा, पासपोर्ट व इतर कागदपत्रे वैध  नसतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या देशात पाठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या कारवाईत दोन करोडचे दोन किलो कोकेन सापडले आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.

- पौर्णिमा चौगुले श्रींगी (पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन)

Web Title : नालासोपारा में 231 नाइजीरियाई गिरफ्तार, 40 अवैध दुकानें सील

Web Summary : नालासोपारा में पुलिस ने अवैध नाइजीरियाई दुकानों पर छापा मारा, 231 अनिर्दिष्ट निवासियों को गिरफ्तार किया। दो करोड़ रुपये की दो किलोग्राम कोकीन जब्त की गई। छापे में बिना परमिट के चल रहे ब्यूटी पार्लर, कपड़ों की दुकानों को निशाना बनाया गया।

Web Title : 231 Nigerians Arrested, 40 Illegal Shops Raided in Nalasopara

Web Summary : Police raided illegal Nigerian shops in Nalasopara, arresting 231 undocumented residents. Two kilograms of cocaine worth ₹2 crore were seized. Raids targeted beauty parlors, clothing stores, and other businesses operating without proper permits.