शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

२ बाय २च्या जागेच्या भाड्यापोटी पश्चिम रेल्वेला पॉलिशवाल्यांनी दिले ११ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 02:30 IST

ए! मै कोई भीख नही ले रहा, मेहनत का पैसा है। हाथ मे उठा के दे असे म्हणणारा, बुटपॉलिश करणारा लहानवयातील अमिताभ आणि बडा हो के ये लडका लंबी रेस का घोडा बनेगा हा इफ्तेखार याचा डायलॉग अजरामर झाला आहे.

वसई : ए! मै कोई भीख नही ले रहा, मेहनत का पैसा है। हाथ मे उठा के दे असे म्हणणारा, बुटपॉलिश करणारा लहानवयातील अमिताभ आणि बडा हो के ये लडका लंबी रेस का घोडा बनेगा हा इफ्तेखार याचा डायलॉग अजरामर झाला आहे.नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांना त्यांच्या वृद्धत्वात ते बेघर झाले असता त्यांना मायेने सांभाळणारा बुटपॉलीशवाला सगळ्यांच्याच काळजाला चटका लावून गेला आहे. अशा बूटपॉलिशवाल्यांचे आणखी एक रूप समोर आले आहे.पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या स्थानकांवर २ बाय २ च्या छोट्याशा जागेत बूटपॉलिश करणाऱ्या या श्रमिकांनी या जागेच्या भाड्यापोटी ११ लाख ६६ हजार , १४२ रुपये पश्चिम रेल्वेच्या खजिन्यात जमा केले आहेत.पश्चिम रेल्वेकडे माजी नगरसेवक राज कुमार चोरघे यांनी माहिती अधिकाराखाली विरार ते चर्चगेट स्टेशन वरील फलाटावर बूट पॉलिश करून पोट भरणाºया कामगारांबाबत सविस्तर माहिती मागवली होती, त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारीआरती सिंग परिहार यांनी ती दिली आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या माहितीनुसार पश्चिम रेल्वच्या विरार ते चर्चगेट दरम्यानच्या प्रत्येक स्थानकातील प्रत्येक फलाटावर दोन फूट बाय दोन फूट च्या जागेत बसणाºया एकूण २६३ बूट पॉलिशवाल्यांकडून मासिक भाड्या पोटी सन २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात ११ लाख ६६ हजार , १४२ रुपयांचे भाडे प्राप्त झाले आहे,हा व्यवसाय अत्यंत संघटीतपणे चालतो. हा व्यवसाय करू इच्छिणाºया व्यक्तीला आधी त्यांच्या असलेल्या सहकारी संस्थेचा सदस्य व्हावे लागते. तिच्याकडून परवाना घ्यावा लागतो. मग त्याला ही संस्था उपलब्ध असेल त्या प्रमाणे व्यवसाय करण्याची जागा नेमून देते. तिथेच त्याला करता येतो. त्याबदल्यात त्याला सोसायटीला काही रक्कमही द्यावी लागते. त्यातूनच ती रेल्वेकडे भाड्याचा भरणा करते. एक शिफ्ट सात ते आठ तासांची असते. सकाळच्या शिफ्टमध्ये व्यवसाय जास्त होत असल्याने तिला सर्वाधिक मागणी असते. तर संध्याकाळपर्यंत चालणाºया शिफ्टला त्यामानाने कमी मागणी असते.विरार -चर्चगेट दरम्यान एकूण २६३ बूट पॉलिश करणारे कामगार हे त्यांच्या ८ विविध सहकारी संस्थांच्या माध्यमाने त्याठिकाणी काम करतात , व ह्या संस्था हे भाडे कामगारांच्यावतीने रेल्वेला देत असते, विरार -मीरा रोड -१२, नालासोपारा -विरार -१२ , मीरा रोड -वसई रोड -२२ ,बोरिवली -बांद्रा -२५ ,खार -गोरेगाव -५३ ,बांद्रा -दादर -५० ,मालाड -विलेपार्ले -१९ मुंबई सेंट्रल -चर्चगेट -७० असे एकूण २६३ कामगार हे फलाटावर बूट पॉलिश करीत आहेत.