शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 12:00 PM

वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली.

वसई : वसई-विरारमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, बाधित रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेने १०० कोविड ऑटो रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे घरीच विलगीकरण करणे शक्य नसेल, अशा रुग्णांना रुग्णालयात, कोविड केअर सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी कोविड रिक्षा रुग्णवाहिकांची सुविधा शहरात करण्याच्या सूचना प्रभारी महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिल्या आहेत.वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्यावर आजवर केलेल्या उपाययोजना व पुढील करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. महापालिकेला ऑक्सिजन पुरवठा करणे, रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा करणे, कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणे आदीबाबतीत महापालिकेला प्राधान्य देण्याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याशी चर्चा करण्यात आली.या बैठकीस उपस्थित पोलीस उप-आयुक्तांशी शहरातील गर्दीच्या ठिकाणी कडक उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या महापालिका अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त, सहा. आयुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकारी, इतर वैद्यकीय अधिकारी व विभागप्रमुखांसोबत प्रभारी आयुक्तांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली व अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. दरम्यान, नागरिकांना सुरळीतपणे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुविधा मिळावी यासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले असून प्रत्येक प्रभागात किमान १० लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. यापैकी दोन लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना प्रथमप्राधान्य देण्यात येईल, असेही या आढावा बैठकीत आयुक्तांनी जाहीर केले. दरम्यान, बाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेची वेबसाईट लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

त्वरित होतील उपलब्धवसई-विरार महानगरपालिका हद्दीत प्रभागनिहाय १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका सर्वत्र उपलब्ध केल्या जाणार आहेत. जेणेकरून रुग्णांची त्वरित ने-आण करणे शक्य होईल. तसेच सदर रिक्षा गल्ली-बोळाच्या ठिकाणी, लहान रस्ते असणाऱ्या ठिकाणीही सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतील, असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस