जि.प. अध्यक्षांनी सोडविले सरपंचाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:53 IST2017-11-27T00:52:58+5:302017-11-27T00:53:15+5:30
नवीन आष्टी येथील ग्रामपंचायतीत अनेक समस्या असून गटविकास अधिकाºयांना याची माहित देऊनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चार दिवसांपासून सरपंच अरुणा गरजे उपोषणावर बसल्या होत्या.

जि.प. अध्यक्षांनी सोडविले सरपंचाचे उपोषण
ऑनलाईन लोकमत
वर्धा : नवीन आष्टी येथील ग्रामपंचायतीत अनेक समस्या असून गटविकास अधिकाºयांना याची माहित देऊनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चार दिवसांपासून सरपंच अरुणा गरजे उपोषणावर बसल्या होत्या. या उपोषण मंडपास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांनी रविवारी भेट देत सरपंचाचे उपोषण सोडविले. यावेळी त्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी खा. रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायती अंतर्गत देण्यात येत असलेल्या घरकुलाची यादी अनुक्रमांकानुसार न घेता ग्रामसचिवाने आपल्या मर्जीने यादी तयार करून लाभार्थ्यांची निवड केल्याचा आरोप करीत सरपंचाने उपोषण सुरू केले होते. यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी उपोषण मंडपास भेट दिली व प्रकरणाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी ग्रामसचिव आणि गटविकास अधिकारी यांनाही बोलवित माहिती घेतली. दोन्ही बाजून जाणून घेत नव्याने यादी तयार करून काम करण्याचे आश्वासन देत सरपंच गरजे यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.