शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबसस्थानक चौकातील घटना : ट्रकचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : भाजी घेण्यास गेलेल्या युवकाला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात युवक गंभीर जखमी झाला. बसस्थानक चौक परिसरात हा अपघात झाला.राहुल चौधरी (२१) रा. मोहगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.राहुल चौधरी हा बसस्थानक चौकात रस्त्याच्या कडेला भरत असलेल्या भाजीबाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेला होता. दरम्यान भरधाव येणाºया एम.एच.३४ बि.जी. २७२४ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. अपघातात राहुलचा उजवा पाय निकामी झाला. धडक दिल्यावर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला.पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.गतिरोधक देण्याची मागणीबसस्थानक चौक परिसरात चौरस्ता असून मोठी बाजारपेठ आहे. बाहेर गावावरून येणाºया नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते. हैद्राबाद मार्गे येणाºया ट्रकला भंडारा मार्गे रायपूरजवळ पडत असल्याने २४ तास अवजड वाहनांचे आवागमण असते. या रस्त्याचे काम होवून तीन महिने उलटले असूनही बसस्थानक चौकात गतिरोधक दिले नसल्याने हा चौरस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ गतीरोधक देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.प्रशासनाचे कायम दुर्लक्षचौरस्त्यावर गतिरोधक देण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली. पण, या मागणीकडे प्रशसनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. गतिरोधक लावण्याचा ठराव ग्रामसभेतही मंजूर करण्यात आला असून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण, तरी देखील याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात