शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

दूध टँकरने आलेली तरुणी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारी ही २२ वर्षीय ही तरुणी किरायाच्या घरात राहून आपले कर्तव्य बजावत होती. घरमालकाने खोली रिकामी करून मागीतल्याने या तरुणीने मूळ गावाकडे परतण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. यापूर्वी सदर तरुणीचा स्वॅब अमरावती येथे घेत तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

ठळक मुद्देकाकडदरा गाव सील : अमरावतीच्या रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणारी तरुणी दुधाच्या टँकरने तळेगाव (श्या.पंत.) नजीकच्या काकडदरा पुनर्वसन येथे मंगळवारी आली. याच तरुणीचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णवाहिकेने अमरावती येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणीचा स्वॅब अमरावती जिल्ह्यातच घेण्यात आला होता, हे विशेष.अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारी ही २२ वर्षीय ही तरुणी किरायाच्या घरात राहून आपले कर्तव्य बजावत होती. घरमालकाने खोली रिकामी करून मागीतल्याने या तरुणीने मूळ गावाकडे परतण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. यापूर्वी सदर तरुणीचा स्वॅब अमरावती येथे घेत तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर तरुणी एम. एच. ३१ एफ. सी. २७१५ क्रमांकाच्या दुधाच्या टँकरने तळेगाव नजीकच्या काकडदरा येथे मंगळवारी पोहोचली. त्यानंतर तिला व तिच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान बुधवारी सकाळी या तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे पुढे येताच तिला एका रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तातडीने अमरावती येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या तरुणीच्या निकट संपर्कात कोण आले होते याचा शोध घेतला जात आहे. आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत ४० व्यक्तींना क्वारंटाईन केले होते.तरुणीची आई अंगणवाडी सेविकाकुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता वर्धा जिल्ह्यातील काकडदरा गावात आलेल्या या तरुणीची आई अंगणवाडी सेविका असल्याचे सांगण्यात आले. तर ज्या वाहन चालकाने या तरुणीला काकडदरा पर्यंत आणले त्याच्या घराचा परिसर पोलीस प्रशासनाने सील केला आहे.तातडीने करावयास लावले घर रिकामेभिष्णूर व काकडधरा येथील तरुणी अमरावती येथील एकाच रुम मध्ये राहत होत्या. १ जून रोजी या तरुणीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. स्वॅब तपासणीला पाठविल्यानंतर या तरुणींना अमरावती येथील रुख्मिनीनगर भागातच होम क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु, घरमालकाने या तरुणींना तातडीने रुम रिकामी करण्यास सांगितल्याने भिष्णूर व काकडदरा येथील तरुणी मूळ गावाकडे परतल्या. भिष्णूर येथील मुलगी रात्री उशीर झाल्याने काकडदरा येथेच होती, असे अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.दहा व्यक्ती आले निकट संपर्कातकोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तरुणीच्या निकट संपर्कात सुमारे दहा व्यक्ती आल्याची माहिती अधिकाºयांच्या चौकशीत पुढे आली आहे. या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या