शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रुचिताच्या लग्नासाठी धावून आली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

वरपक्षाकडील मंडळी विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च करणार असून काही मदत उभारायची असल्याचे सांगितले. मोहित सहारे नामक तरुणाने नीता जानी यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापुढे व्यथा मांडली. जानी यांनी शक्य होईल, तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. लायन्स क्लब वर्धा ट्रस्टच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे, योगीता मानकर आणि नीता जानी यांनी स्वत: भेटून आर्थिक स्वरूपात मदत केली.

ठळक मुद्देजोपासले सामाजिक उत्तरदायित्व : अनेकांनी रोख, साहित्य स्वरूपात केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरची हलाखीची परिस्थिती, त्यामुळे हातावर आणणे आणि पानावरच खाणे अशीच दिनचर्या. मुलगी लग्नाला आलेली; मात्र पैसा अदलाच नसल्याने लग्न कसे करायचे या पेचात असताना युवाशक्तीने संघटित होत आर्थिक मदत उभी केली. कुणी विवाहाकरिता लागणारे साहित्य मदत स्वरूपात दिले आणि अखेर रुचिताचा विवाह पार पडला.सिंदी (मेघे) परिसरात रवी उके वास्तव्याला आहेत. त्यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले; रवी उके किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. दोन बहिणींचे लग्न झाले आहे. रुचिता ही तिसऱ्या क्रमांकाची असून एक लहान भाऊ आहे. कुटुंबात कुणीच कर्ता नसल्याने रुचिताचे लग्न करण्यात अडचणी निर्माण झाल्या. याविषयी परिसरातील जय उके या तरुणाला माहिती मिळाली. त्याने इतर मित्रांना ही बाब सांगितली. वरपक्षाकडील मंडळी विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च करणार असून काही मदत उभारायची असल्याचे सांगितले. मोहित सहारे नामक तरुणाने नीता जानी यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापुढे व्यथा मांडली. जानी यांनी शक्य होईल, तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. लायन्स क्लब वर्धा ट्रस्टच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे, योगीता मानकर आणि नीता जानी यांनी स्वत: भेटून आर्थिक स्वरूपात मदत केली.वरपक्षाकडील पाहुण्यांना लग्न स्थळी घेऊन जाण्यासाठी गाडीची गरज भेडसावत होती. तरुणांनी रवींद्र कोटंबकर यांच्याशी संपर्क करीत त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. कोटंबकर यांनी गाडी देण्यासोबतच इतर आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. गाडीचा संपूर्ण खर्च त्यांनी स्वत: उचलला. मुलीची तयारी करून देण्यासाठी कुणी नव्हता. युवकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर याविषयी मजकूर टाकला आणि मदतीचे आवाहन केले. ग्रुपमधील सदस्य हर्षाली बोरसरे, वैष्णवी सहारे आणि रेवा यांनी होकार दिला आणि मुलीची संपूर्ण लग्नाची तयारी करण्यास मदत केली.तरुणाईने पुढाकार घेतला आणि रुचिताचा आनंदाच्या वातावरणात विवाह पार पडला. या संपूर्ण उपक्रमात मोहित सहारे, जय उके, अंकित बारंगे, पंकज गावंडे, तेजस ठाकरे, तन्मय मेश्राम यांच्यासह अनेकांनी मोलाची मदत केली. एका अत्यंत गरीब कुटुंबातील मुलीच्या आयुष्याची सुरूवात तरुणाईने पुढाकार घेत केलेल्या मदतीने झाल्याने परिसरात तरुणांचे कौतुक केले जात आहे.