यंदा होळी सणावर कोरोनाने फेरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:18+5:30
होळीच्या उत्सवात वाबरले जाणारे रंग चीनमधून येतात. असे रंग वापरू नका अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहेत. वसंत ऋतूमधील फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. दरवर्षी बाजारपेठेत या सणानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला असतो. यावेळी मात्र, कोरोनाच्या भीतीने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करूत साजरा केला जातो.

यंदा होळी सणावर कोरोनाने फेरले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : होळी सणावरही यंदा कोरोनाची गडद छाया आहे. या उत्सवात वापरले जाणारे रंग चीनमधून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाने जगभर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतातही काही रुग्ण आढळून आले आहेत. सोशल मीडियात याविषयी मेसेज व्हायरत होत आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. असे असले तरी बाजारपेठेवरही कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे.
होळीच्या उत्सवात वाबरले जाणारे रंग चीनमधून येतात. असे रंग वापरू नका अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहेत.
वसंत ऋतूमधील फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. दरवर्षी बाजारपेठेत या सणानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला असतो. यावेळी मात्र, कोरोनाच्या भीतीने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करूत साजरा केला जातो. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येते. संसर्गातून पसरणाऱ्या या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, स्पर्श टाळणे, मास्कचा वापर करणे यासारख्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने सुचविल्या आहेत. चीनमधून रंग आणि इतर साहित्य येत असल्याने ते खरेदी करायचे की नाही, या संभ्रमात वर्धेकर नागरिक दिसून येत आहेत.
वर्ध्याच्या बाजारपेठेत नागपूर येथून रंग आणि इतर साहित्य विक्रेते विक्रीस आणतात. अवघ्या दोन-तीन दिवसांवर होळी सण येऊन ठेपला असताना बाजारपेठेत निरुत्साहाचे वातावरण आहे. विक्रेत्यांना ग्राहकांची अक्षरश: प्रतीक्षा करावी लागत आहे.
मास्क खरेदी वाढली
जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण अद्याप आळून आलेला नाही. तरीदेखील वर्धेकर नागरिकांत कमालीची भीती आहे. मेडिकल स्टोअर्समधून नागरिक मास्क खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. पोल्ट्री फार्म या व्यवसायावरही कोरोनाची गड छाया असून जिल्ह्यातील अनेक व्यवसाय बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे.