शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी धोरणच चुकीचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना तसेच शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवून याच्याच आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय अर्थमंत्र्यांना प्रश्न : शैलेश अग्रवाल यांनी पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजप सरकार व्दारा वारंवार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले जात आहे. नुकताच नाबार्डद्वारा आयोजित दोन दिवसीय ग्रामीण तथा कृषी वित्त विश्व काँग्रेसच्या शुभारंभाप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष वेधून उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनाची माहिती दिली पण; शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांत वाढ झाली नाही. म्हणून एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार कसे? असा थेट प्रश्न केला आहे.शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना तसेच शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवून याच्याच आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांना गोड स्वप्न दाखविण्यापेक्षा उत्पादन खर्च कमी करुन मालाला योग्य भाव आणि दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या बाजार मुल्याच्या बरोबर आर्थिक सुरक्षा प्रदाण केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न खऱ्या अर्थाने वाढू शकते.शासनाच्या चुकीच्या कृषी विषयक धोरणाबद्दल अभ्यासू शेतकऱ्यांनी चर्चा केली तर त्याला विरोध समजून टाळण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांनाही मत मांडण्याची संधी दिल्यास शेतकऱ्यांच्या उन्नतीकरिता सशक्त धोरण ठरु शकते. या करिताच एकच मिशन शेतकरी आरक्षणने शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्या आरक्षणाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यास २०२२ नाही तर २०२० मध्येच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट हाऊ शकते.असा विश्वासही शैलेश अग्रवाल यांनी अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून दिला आहे.‘पीएमओ’सह मंत्रालयालाही दिला प्रस्तावउत्पादन खर्च कमी करण्याकरिता वीज, खत, बी-बियाणे व कीटकनाशके मोफत देण्याकरिता जन कृषी सेवा केंद्र, वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर न्युनतम समर्थन मूल्य ठरविण्याची कार्यपद्धती, न्युनतम समर्थन मूल्यानुसार वर्षभर रोख खरेदी-विक्री केंद्र सुरूकरणे, पीक विमा बंद करून बाजर मूल्याबरोबर सुरक्षा देणे, पशुपालकांना मोफत चारा व पशुखाद्य पुरविणे, दुधाला कमीतकमी ७० ते १०० रुपये प्रति लिटर दर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केजी टू पीजी मोफत शिक्षण आदी उपाय शेतकरी आरक्षणात सुचविले असून ते पीएमओसह मंत्रालयाकडेही पाठविण्यात आल्याचे अग्रवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांना कळविले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी