शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जखमा झालेल्या पायांनी त्यांनी धरली गावाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले.

ठळक मुद्देकामगारांची पायपीट कायमच : प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाने गावांच्या वाटा थांबविल्या. हजारो कामगार, विद्यार्थी आदी जागच्या जागेवरच थांबले. परतीचा प्रवास कधी करायला मिळणार, याची कुणालाही खात्री नव्हती. शासनाने परतीचे मार्ग सुरू केले. पण, त्यातही अडथळ्यांची शर्यत. यात मजुरांची परवड होत आहे. प्रखर उष्णतामान, चालताना रस्त्यांचे असह्य चटके सहन करीत मजुरांनी सुरू असलेली मजल-दरमजल शासन, प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आशेने पाहत आहे.लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढला आणि सर्वांच्याच जिवाची घालमेल सुरू झाली. शासनाकडून परराज्यात, परजिल्ह्यात जाणाऱ्यांची व्यवस्था करण्यास सुरूवात झाली. त्याकरीता काही निमयावली लागू करण्यात आली. शासन उपाययोजना करीत असले तरीही मजुरांचे गावाकडे मार्गक्रमण सुरू आहे. अनेक जण मिळेल त्या वाटेने गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर्ध्यातही मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे यवतमाळ जिल्ह्यातून २४ कामगार आले. यवतमाळ जिल्ह्याच्या आणि तालुक्यातील एका भागात रस्त्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.लॉकडाउनच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा काळ काढला. पण, आता खाण्यापिण्याचे वांधे होऊ लागल्याने परतीचा मार्ग धरल्याचे कामगारांनी सांगितले. ज्या कंत्राटदाराने कामावर आणले, तोही परराज्यातील आहे. एकमेकांच्या ओळखीने त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मागील चार दिवसांपासून सातत्याने ते चालत आहेत. आज ते जिल्हाधिकारी कार्यालयापुढे रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत विसावलेत. यातील बहुतांश मजुरांचे पाय चालल्याने सुजले आहेत काहींनी पायाला झालेल्या जखमा चिंध्या गुंडाळून झाकल्या आहेत. या कामगारांना गावी जाण्यासाठी येथून वाहनाची सुविधा करून मिळेल, अशी अपेक्षा आहे.मदत मिळाली, गावी जाण्याची व्यवस्था हवीचालताना वाटेमध्ये मदत मिळाली. कुणी जेवण दिले तर कुणी पाणी दिले. पण, वाहन नसल्याने ही पायपीट असह्य होत आहे. अजूनही या कामगारांची गावे हजारो किलोमीटर दूर अंतरावर आहे. आताच पायाला दुखापत झाली आहे. पुढचा प्रवास तर असह्य वेदना करणारा ठरू शकतो. प्रशासनाने गावी जाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या