शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

जागतिक चिमणी दिन; वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:25 PM

सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे.

ठळक मुद्देसमाजात जागृतीची गरजपक्षीमित्रांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एखाद्या नैसर्गिक आपत्तीत घर नष्ट झाले तर एका क्षणात आपण उघड्यावर येतो. खुप आबाळ सहन करावी लागते. ही झाली मानवी समुहाच्या घराची गोष्ट. मात्र आपल्या भावना शब्दात न मांडूू शकणाऱ्या या सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे.प्रशासकीय स्तरावर जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येतो या माध्यमातून जनजागृती करण्यात येते, मात्र ती पुरेशी नसल्याच्या प्रतिक्रिया प्राणीमित्र व्यक्त करतात. प्रशासकीय यंत्रणेसह सामाजिक संस्थांचा यात सहभाग वाढविणे गरजेचा आहे. वर्धा शहर तसेच हिंगणघाट, आर्वी, देवळी येथे काही पर्यावरणपे्रमी संघटनांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांकरिता उन्हाळ्यात दाणापाण्याची सोय व्हावी म्हणून मातीचे भांडे वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यात वर्षागणिक नागरिकांचा सहभाग वाढत आहे. मात्र याची अंमलबजावणी कशी होते याचा आढावा घेणारी यंत्रणा येथे नाही. समाजात जोपर्यंत पक्ष्यांच्या वास्तव्याबाबत अधिवास आणि अस्तित्व टिकविण्यासाठी पक्ष्यांना संघर्ष करावा लागेल, असा सूर प्राणी मित्रांमधून उमटत आहे.बहार नेचर फाउंडेशन, पिपल्स फॉर अ‍ॅनिमल, नारायण सेवा मित्र परिवार, हिंगणघाट आदी संघटनांकडून जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधुन मातीच्या पात्रांचे वाटप करण्यात येते. घरोघरी हे पात्र लावुन त्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे स्वयंसेवक मातीचे पात्र आणि पक्ष्यांसाठी घरटी दिलेल्यांचा आढावा घेतात. यात पक्षी आलेत का, त्यांनी अंडी घातली काय, याची पाहणी करुन नोंद घेतली जाते. यात प्रत्येक स्वयंसेवकांकडे दहा घरांची जवाबदारी देण्यात येते.

करूणाश्रमात जागतिक चिमणी दिवस वर्धेतील पीपल फॉर अ‍ॅनिमल्स ही संस्था बऱ्याच वर्षांपासून पशुपक्ष्यांच्या सेवेकरीता कार्य करीत आहे. २० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त मुक्त झालेल्या पिंजाऱ्यांचे प्रदर्शन करूणाश्रम परिसरात भरविण्यात आले. मुक्त झालेल्या पक्ष्यांकरिता मुक्तांगणाची निर्मिती करुणाश्रम व्यवस्थेने केली असून दरवर्षी पक्षी दिनानिमित्त पक्ष्यांची घरटी व पाण्याची भांडी संस्थेमार्फत वितरित केली जाते.यावर्षी पक्षी दिनाचे औचित्य साधून पक्ष्यांकरिता पाण्याचे भांडे व पक्ष्यांचे घरटे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. वर्धा लोकसभेचे खा. रामदास तडस यांनी स्वत: पुढाकार घेत स्वहस्ते करूणाश्रमात येऊन लोकांना चिमण्यांचे घरटे व पाण्याच्या भांड्याचे वाटप केले. स्वत: झाडावर चिमण्यांकरिता घरटे लावले. या कार्यक्रमाकरिता पिपरी ग्रामपंचायत परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.      

   चिमणी दिनाची सुरुवात२००६ मध्ये भारतात चिमणी या पक्ष्यांच्या संवर्धनाचे कार्य सुरू झाले. ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ चे मोहम्मद दिलावर यांनी सर्वप्रथम घरगुती चिमणीच्या संवर्धनाची गरज व्यक्त करुन तिला वाचविण्यासाठी मोहीम हाती घेतली. यानंतर शासकीय स्तरावर चिमणी दिन साजरा होऊ लागला. सर्वप्रथम अमेरिकेत ‘हाऊस स्पॅरो डे’ साजरा करण्यात आला.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य