एकुर्ली चौफुली ते तळेगाव रस्त्याचे काम अर्धवट

By Admin | Updated: October 16, 2015 02:59 IST2015-10-16T02:59:06+5:302015-10-16T02:59:06+5:30

एकुर्ली चौफुली ते तळेगाव (टा.) पर्यंतच्या तीन किमी रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या दिवसात हाती घेण्यात आले; पण ते अद्यापही पूर्ण केले नाही.

The work of Ekurli Chaufuli from Talegaon Road is half-way | एकुर्ली चौफुली ते तळेगाव रस्त्याचे काम अर्धवट

एकुर्ली चौफुली ते तळेगाव रस्त्याचे काम अर्धवट

अपघाताचा धोका : वाहतूक विस्कळीत
अल्लीपूर : एकुर्ली चौफुली ते तळेगाव (टा.) पर्यंतच्या तीन किमी रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या दिवसात हाती घेण्यात आले; पण ते अद्यापही पूर्ण केले नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. याकडे लक्ष देत सदर काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
चार महिन्यांपूर्वीच चार एमएम गिट्टी व साहित्य टाकण्यात आली; पण नंतर कुठलेही काम करण्यात आले नाही. तीन किमी तर दूर एकुर्ली चौफुलीपर्यंतही काम पूर्ण करण्यात आले नाही. चार महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद आहे. तळेगाव येथून काही अंतरापर्यंत अर्धवट मोठे बोल्डरचे खडीकरण काम सुरू केले; पण तेही अर्धवट आहे. यामुळे चार एमएम मोठी गिट्टी उखरून असून खड्डे पडले आहे. यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागतात. विखुरलेल्या गिट्टीमुळे रात्री अपघात होत आहेत. संपूर्ण तीन किमी रस्त्याचे काम करणे अपेक्षित असताना एक किमीचे कामही पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे पूर्वीचा रस्ताच बरा होता, अशा प्रतिक्रीया उमटत आहे. कामावर गिट्टीचा दुसरा कोट मारणे बंधनकारक आहे; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: The work of Ekurli Chaufuli from Talegaon Road is half-way