तहसील कार्यालयावर धडकल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:05 IST2019-04-23T22:04:45+5:302019-04-23T22:05:22+5:30
चारमंडळ येथे शासकीय स्वस्त धान्य दुकान मिळावे, याकरिता महिला बचतगटाने प्रयत्न केला. पण महिला बचतगटाला डावलून दुसऱ्याच व्यक्तीला दुकान चालविण्याकरिता देण्यात आल्याने महिला बचतगटाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत स्वस्त धान्य दुकान महिला बचतगटाला देण्यात यावे, अशी मागणी केली.

तहसील कार्यालयावर धडकल्या महिला
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : चारमंडळ येथे शासकीय स्वस्त धान्य दुकान मिळावे, याकरिता महिला बचतगटाने प्रयत्न केला. पण महिला बचतगटाला डावलून दुसऱ्याच व्यक्तीला दुकान चालविण्याकरिता देण्यात आल्याने महिला बचतगटाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत स्वस्त धान्य दुकान महिला बचतगटाला देण्यात यावे, अशी मागणी केली.
येथील महिला बचतगटाने या आधी स्वस्त धान्य दुकान मिळावे याकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महसूल विभागाकडे मागणी केली होती. त्या मागणीवर विचार न करता व गावातील महिला बचतगट दुकान चालविण्यास तयार असताना महाबळा येथील व्यक्तीस स्वस्त धान्याचे दुकान चालविण्याकरिता देण्यात आले.
महिलांना सक्षम करण्यासाठी गावागावात बचत गटाची निर्मिती करण्यात आली. स्वस्त धान्य दुकानासह इतरही कामे बचत गटांना देण्याची भूमिका असतानाही अधिकाऱ्यांकडून त्यांच्या अधिकाराव घाला घातल्या जात आहे.
चारमंडळ गावातील महिला बचतगटाला हे दुकान महिलांच्या सक्षमीकरणाकरिता, बचतगटाच्या उत्पन्नाकरिता द्यावे, अशी अपेक्षा बचत गटाला असल्याने त्यांनी रितसर स्वस्त धान्य दुकानाची मागणी महसूल विभागाकडे केली होती. परंतु महिला बचत गटाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करुन दुसºयालाच परवागनी देण्यात आली. त्यामुळे संतप्त महिलांनी तहसीलदारांना निवेदन सादर करीत प्रशासने केलेली चूक निदर्शनास आणून दिली. सोबतच दुकानाची मागणीही निवेदनातून केली. निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य मंगला डफरे, सुनीता चाटे, वैशाली येंगडे, अरुणा करडे, दुर्गा पाटील, रेखा इवनाथे यांच्यासह बचत गटाच्या महिलांसह पुरुष बचत गटाचेही सदस्य उपस्थित होते.