‘त्या’ कर्मचाऱ्याविरोधात महिला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:46 AM2018-03-13T00:46:13+5:302018-03-13T00:46:13+5:30

क्रांती शहरस्तर संस्थेच्या नेतृत्त्वात सोमवारी महिलांनी शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढला.

Women against the 'workers' in the streets | ‘त्या’ कर्मचाऱ्याविरोधात महिला रस्त्यावर

‘त्या’ कर्मचाऱ्याविरोधात महिला रस्त्यावर

Next
ठळक मुद्देमोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
वर्धा : क्रांती शहरस्तर संस्थेच्या नेतृत्त्वात सोमवारी महिलांनी शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या महिलांनी वर्धा नगर परिषदेच्या कर्मचारी लिखीता ठाकरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी व उत्तम हापसे यांची बदली थांबवावी अशी मागणी लावून धरली. तसे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.
शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. वर्धा नगर परिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या विविध बचत गटांच्या महिलांना निखीता ठाकरे यांच्याकडून त्रास दिल्या जात असल्याचा आरोप या महिलांनी निवेदनातून केला. आंदोलनाचे नेतृत्त्व शारदा झामरे यांनी केले. या आंदोलनात रत्नमाला साखरे, प्रिया सोले, नंदा कुसळे, शांता यांच्यासह महिला बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.
न्याय न मिळाल्यास राजीनामे
सदर प्रकरणी कार्यवाही व्हावी या हेतूने यापुर्वी संबंधितांना निवेदन दिले होते. परंतु, त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मोर्चा काढून मागणी रेटण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मागणीवर विचार न झाल्यास वर्धा नगर परिषद अंतर्गत असलेले बचत गट बंद करून राजीनामे देण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनातील या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शारदा झांबरे यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: Women against the 'workers' in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.