रक्तबंबाळ झालेल्या युवकाला पाहिल्याने महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 14:44 IST2020-07-17T14:43:55+5:302020-07-17T14:44:51+5:30
रुग्णालयात अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेला युवक रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच लक्ष्मी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्ची वरून खाली पडल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

रक्तबंबाळ झालेल्या युवकाला पाहिल्याने महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू वार्ड न 2 येथील रहिवासी मृतक महिला लक्ष्मी पळसराम वांदिले वय 60 वर्ष ही महिला शुक्रवारी सकाळी आपले नातू राहुल वांदिले याच्यासोबत सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दर अडीच महिन्याप्रमाणे बीपी शुगर चे ट्रीटमेंट घेण्याकरिता गेली होती. रुग्णालयात अगोदर आलेल्या पेशंटची तपासणी चालू असल्यामुळे मृतक महिला डॉक्टरचे केबिनचे बाहेर बसून होती,. तितक्यातच रुग्णालयात अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेला युवक रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच लक्ष्मी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्ची वरून खाली पडल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
त्यांच्या पार्थिवावर सेलू येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला असून त्यांचे मागे पती, मुलगा, तीन मुली, जावई नातवंडे असा बराच आप्तपरिवार आहे.