शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अजब शक्कल... ‘ती’ने घरातील ‘देव्हाऱ्या’लाच बनविला ‘दारूअड्डा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 11:01 IST

दारुविक्रेता महिलेस अटक : १० हजारांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

वर्धा : वर्धा जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभाल्याने जिल्ह्यात दारुबंदी झाली. मात्र, तरीही आजघडीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची उलाढाल होते, हे धडधडीत वास्तव आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्ध्यात येताच त्यांनी दारुविक्रेत्यांना सळो की पळो करून सोडले. दारूअड्डे बंद झाले. अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. मात्र, तरीही काही दारूविक्रेते विविध शक्कल लढवून दारूविक्री करतातच, हे या घटनेने अधोरेखित झाले आहे.

एका महिलेने चक्क घरातील देव्हाऱ्यालाच दारूअड्डा बनवल्याचे सावंगी पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आले. सालोड गावातील एक महिला दारूविक्री करते, अशी माहिती सावंगी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून सालोड गावातील रहिवाशांकरवी त्या महिलेवर ‘वॉच’ ठेवला जात होता. मात्र, ती दारू विकताना आढळून येत नव्हती. अखेर सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, श्रावण पवार यांनी कर्मचाऱ्यांसह सालोड हिरापूर गाव गाठून महिलेच्या घराची तपासणी केली असता घरातील देवघरातच दारू लपवून ठेवलेली आढळून आले. पोलिसांनी दारूविक्रेत्या महिलेला अटक करून तिच्याकडून तब्बल १० हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

‘देवघराला’ केली होती रोषणाई

पोलिसांना संशय येऊ नये, म्हणून दारूविक्रेत्या महिलेने घरातील देवघराच्या ड्राव्हरमध्ये दारूसाठा लपविण्याची अजब शक्कल लढविली. यासाठी तिने देवघराला रोषणाई केली होती. संपूर्ण घराची तपासणी केल्यानंतर पोलिसांची नजर देवघरावर पडली अन् बिंग फुटले.

अन् पोलिसही झाले अवाक्...

दारूविक्रेती महिलेच्या घरी सावंगी पोलिसांनी छापा मारला असता पोलिसांना देवघरात दारू मिळून आली. देव्हाऱ्याच्या अगदी खालच्या ड्राव्हरमधून दारूच्या बाटल्यांचा खच काढताच उपस्थित पोलिसही हे पाहून अवाक् झाले.

दररोज कारवाई तरीही दारुविक्री सुरुच..

पोलिस विभागाकडून दररोज दारुविक्रेत्यांवर कारवाई करून लाखों रुपयांचा दारुसाठा पकडून गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र, तरीही काही मुजोर पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारुविक्री करीत असल्याचे शहरात चित्र आहे.

ग्राहकाची ‘टीप’ अन् यशस्वी कारवाई

सालोड गावातील महिला दारूविक्री करीत असल्याची माहिती सावंगी पोलिसांना होती. पोलिसांनी मागील महिनाभरापासून तिच्यावर करडी नजर ठेवली होती. पण, पोलिस यशस्वी होत नव्हते. अखेर तिच्याकडे दारू पिण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकाला पकडून पोलिसी हिसका दाखवला असता त्याने दारू आणताना खर्रर्र आवाज येत असल्याचे सांगितले. पण, नेमका तो आवाज कोठून येत होता, हे त्याला माहिती नव्हते. अखेर पोलिसांनी देव्हाऱ्यातील ड्राव्हरची तपासणी केली असता ड्राव्हर उघडताना आवाज आला अन् पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ड्राव्हरमध्ये हात टाकला असता दारूच्या शिशाच हाती लागल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीwardha-acवर्धा