Crime: मजुरीच्या पैशांसाठी पत्नीचे डोके जमीनीवर ठेचून खून! आरोपी पतीस अटक

By चैतन्य जोशी | Updated: October 14, 2023 19:01 IST2023-10-14T19:00:33+5:302023-10-14T19:01:16+5:30

Crime News: मजुरीच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादात संतप्त पतीने पत्नीचे डोके जमिनीवर ठेचून तिची हत्या केल्याची घटना पुलगाव येथील दखनी फैल परिसरात १३ रोजी रात्रीला घडली.

Wife's head crushed on the ground and killed for wage money! Accused husband arrested | Crime: मजुरीच्या पैशांसाठी पत्नीचे डोके जमीनीवर ठेचून खून! आरोपी पतीस अटक

Crime: मजुरीच्या पैशांसाठी पत्नीचे डोके जमीनीवर ठेचून खून! आरोपी पतीस अटक

- चैतन्य जोशी
वर्धा -  मजुरीच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादात संतप्त पतीने पत्नीचे डोके जमिनीवर ठेचून तिची हत्या केल्याची घटना पुलगाव येथील दखनी फैल परिसरात १३ रोजी रात्रीला घडली. याप्रकरणी आरोपी पतीला पुलगाव पोलिसांनी अटक करीत बेड्या ठोकल्या. मंगला राजेश राजगत्ता (४५ रा. दखनी फैल, पुलगाव) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती राजेशसिंग राजदत्ता (५५) याला अटक केली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, राजेशसिंग राजदत्ता याचा पत्नी मंगला हिच्यासोबत मजुरीच्या पैशाच्या कारणातून वाद झाला होता. राजेशसिंग याने पत्नी मंगला हिला याच कारणातून संतप्त राजेशसिंग याने पत्नी मंगलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तिचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. याप्रकरणाची तक्रार राहुल रामदास चांनपुरकर (४३) याने पुलगाव पोलिसांत दिली. पुलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी घटनेची दखल घेत आरोपी राजेशसिंग याला दखनी फैल परिसरातून अटक करीत बेड्या ठोकल्या. पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.

Web Title: Wife's head crushed on the ground and killed for wage money! Accused husband arrested